
हिमायतनगर। तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे हिमायतनगर शहर व तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यात हळद, कांद्याचे मोठे नुकसान झाले असून, नुकसान ग्रस्त मालाचे व पिकाचे पंचनामा करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते बालाजी बलपेलवाड यांनी केली जाते आहे.

