
नवीन नांदेड। नावामनपाचा सिडको क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत प्रभाग क्रमांक १९ व २० मध्ये पावसाळ्या पुर्वी नाले साफसफाई मोहीम कामाची सुरुवात करण्यात आली आहे.


गेल्या आठवड्यात संततधार अवकाळी पावसाळ्याने अनेक नाले तुंडुंब भरून वाहुन कचरा व गाळ मोठया प्रमाणात रस्त्यावर वाहुन अनेकांच्या घरात पाणी शिरल्या नंतर तात्काळ सिडको क्षेत्रीय कार्यालय सहाय्यक आयुक्त डॉ. रईसौधदीन यांनी स्वच्छता विभागाला आदेशीत करून रस्तायावरील व अंतर्गत नाला साफसफाई मोहीम हाती घेण्यात आली.


तयानंतर,सिडको मनपा क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत असलेल्या प्रभाग क्रमांक १९ व २० मधील सर्वात मोठा असलेला हा नाला गुरूवार बाजार, इंदिरा गांधी हायस्कूल,सिडको मोढा प्रकल्प अंतर्गत असलेल्या वसाहातीतीतुन सिडको भागातील अनेक भागातून जात असून या नाल्यातील केर कचरा व गाळा काढण्याचा मोहीम मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली.


यासाठी उपायुक्त डॉ खानसोळे, उपायुक्त सुंकेवार, सहाय्यक आयुक्त डॉ. रईसौधदीन यांच्या आदेशानुसार स्वच्छता विभागाचे प्रमुख वसिम तडवी ,व स्वच्छता विभाग प्रमुख किशन वाघमारे, अर्जुन बागडी यांनी जे. सी. बी. साहाय्याने हे अभियान ४ मे पासून सुरूवात करण्यात आली आहे. या स्वच्छता मोहीम अंतर्गत म्हाडा वसाहत ते माहेश्वरी भवन, नाले साफसफाई मोहीम हाती घेण्यात आल्यामुळे सखल भागात साचणारे पाऊस मुळे पाणी साचणारा नसुन पाण्याचा निचरा होणार आहे. या मोहीम मुळे गेल्या वर्षापासून तुबेलेला गाळ मोठया प्रमाणात निघणार आसुन अवकाळी किंवा पावसाळ्यात होणाराया पावसामुळे अनेक भागातील नागरीकांना दिलासा मिळणार आहे.
