Tuesday, June 6, 2023
Home करियर एमपीएससी-यूपीएससी परीक्षेत गणित व इंग्रजी विषयाचा अभ्यासासह जनरल नॉलेजवर भर द्यावा – डॉ. ए.आर. खान – NNL

एमपीएससी-यूपीएससी परीक्षेत गणित व इंग्रजी विषयाचा अभ्यासासह जनरल नॉलेजवर भर द्यावा – डॉ. ए.आर. खान – NNL

by nandednewslive
0 comment

नांदेड। स्पर्धा परीक्षेत यश संपादन करण्यासाठी जिद्द, मेहनत आणि वेळेचे व्यवस्थापन आवश्यक आहे. बारावीनंतर स्पर्धा परीक्षेच्या तयारीला लागावे. एमपीएससी-यूपीएससी परीक्षेत गणित व इंग्रजी विषयाचा अभ्यासासह जनरल नॉलेजवर भर द्यावा, असे प्रतिपादन दिल्ली येथील के.एस.जी. आयएएस इन्स्टिट्यूटचे संचालक डॉ. ए.आर. खान यांनी केले.

नांदेड येथे बुद्धिस्ट सोशल ऑर्गनायझेशनच्या वतीने घेण्यात आलेल्या यूपीएससी आणि एमपीएससी स्पर्धा परीक्षेची तयारी या विषयी मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन गुरुव्‍दारा सचखंडचे उपमुख्य पुजारी बाबा ज्योतिंदरसिंघजी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मंचावर जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, दत्ताहरी धोत्रे, चक्रधर मोरे यांची उपस्थिती होती.

पुढे ते म्हणाले, प्रथमतः मला एमपीएससी-यूपीएससी का करावयाची आहे, असा प्रश्न विद्यार्थ्यांनी स्वतःला विचारावा त्यानंतरच स्पर्धा परीक्षेकडे वळावे. अभ्यासासाठी काय करावे यापेक्षा काय करू नये याची यादी तयार करून ठरवलेल्या गोष्टी टाळाव्यात. सन 2013 नंतर स्पर्धा परीक्षेत बदल झाले आहेत. हे बदल जाणून घेऊन अभ्यासक्रमानुसार सुरुवात करावी. पूर्वीच्या प्रश्न पत्रिका सोडवण्यावर भर द्यावा. जनरल नॉलेजसाठी नियमित दर्जेदार वर्तमानपत्रांचे वाचन करावे. महत्त्वाचे टिपण काढावे असेही ते म्हणाले. स्पर्धा परीक्षेच्या तयारीत पालकांची महत्त्वाची भूमिका असून यासाठी पालकांनी मुलांना प्रोत्साहित करावे असे खान म्हणाले.

या मार्गदर्शन शिबिरात स्पर्धा परीक्षा म्हणजे काय? वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा कोणत्या असतात, या परीक्षेची तयारी नेमकी कशी करावी? स्पर्धा परीक्षा देण्यासाठी पदवीधर होण्याची वाट पहावी का? बारावीनंतरही या परीक्षेची तयारी करता येते का? करिअरच्या वाटेवर असताना नेमके काय साध्य करायचे, एमपीएससी-यूपीएससी परीक्षेची स्पष्टता आणि यश संपादन करण्यासाठी कसे नियोजन करावे यासह विविध विषयावर डॉ. ए. आर. खान यांनी विद्यार्थ्यां संवाद साधला.

प्रारंभी तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या मूर्तीस तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती राजर्षी शाहू महाराज व एपीजे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करण्यात आले. यानंतर उपस्थित मान्यवरांचा स्मृतिचिन्ह, शाल व पुष्पहार देऊन ऑर्गनायझेशनच्या वतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी बाबा ज्योतिंदरसिंघजी म्हणाले, स्पर्धा परीक्षेत टिकून राहायचे असेल तर कल्पकता असणे गरजेचे आहे. स्मार्ट विद्यार्थीच सहज यश संपादन करू शकतात. पूर्व व मेन परीक्षेसह मुलाखतीची तयारी याविषयी त्यांनी मार्गदर्शन केले.

जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना अभ्यास तर करावाच लागतो परंतु जास्त ताण न घेता सहज अभ्यास करावा. या परीक्षेत यश मिळाले नाही तर अनेक विद्यार्थी डिप्रेशन मध्ये जातात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी बी प्लॅन तयार ठेवावा. त्यानुसार आपले करिअर करता येऊ शकेल, असेही ते म्हणाले.

यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, आयपीएस सुमित धोत्रे, शुभम नागरगोजे व आयआरएस शिवहार मोरे यांनी दृकश्राव्य माध्यमातून संवाद साधला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ राम वाघमारे यांनी केले. सुत्रसंचालन डॉ विलास ढवळे यांनी तर उपस्थितांचे आभार मिलिंद चावरे यांनी मानले.

या कार्यक्रमासाठी दिल्ली येथील प्रवीण वैध, जस्विंदर सिंग, प्रा. शुद्धोधन गायकवाड, दत्ताहरी धोत्रे, मिलिंद चावरे, बाबुराव कसबे, संजय नरवाडे, डॉ. राम वाघमारे, भगवान गायकवाड, किशोर अटकोरे, चंद्रमुनी कांबळे, रवी लोहाळे व मिलिंद व्यवहारे यांनी पुढाकार घेतला.या कार्यक्रमाला बहुजन नेते सुरेशदादा गायकवाड, स्वामी रामानंद तीर्थ मराठा विद्यापीठाचे रवी सरोदे, पोलीस निरीक्षक मोहन भोसले, शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर, दिलीप बनसोडे, एन. डी. गवळी, नंदकुमार बनसोडे, प्रा. नागेश कल्याणकर, आर.एस. शिंदे, राजेश जाधव, डी. बी नाईक, जयपाल वाघमारे, प्रल्हाद लोहेकर, प्रा. शशिकांत टोलमारे, भास्कर देशमुख, प्रल्हाद घोरबांड, भालचंद्र जोंधळे यांच्यासह पालक व विद्यार्थी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

संबंधित बातम्या वाचा

Leave a Comment

nandednewslive.com या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेत स्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Visitor counter NNL

Copyright @ 2011-2023 Online Social News Live Channel All Right Reserved -Developed & Designed by M&D Infotech Latur, Call – 86687 76434 

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
error: Content is protected !!