
उस्माननगर। दरवर्षी प्रमाणे याही वर्षी कंधार तालुक्यातील मौजे उस्माननगर येथे सैलानी बाबा संदलाचे आयोजन (सरकार बाबा ) इस्माईल तांबोळी यांच्या मार्गदर्शनाखाली अब्दुल रहेमान बाबा सैलानी सरकार संदलाचे आयोजन करण्यात आले आहे.


संपूर्ण महाराष्ट्रात कोरोना या रोगामुळे सर्व उत्साहावर बंदी केल्यामुळे भक्तामध्ये नाराजी दिसून आली होती.. उस्माननगर येथे अब्दुल रहेमान बाबा सैलानी सरकार यांची यात्रा भरविण्यात येणार आहे. त्यानंतर दि ९ मे रोजी येथील प्रमुख ( बाबा ) सरकार इस्माईल तांबोळी यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य संदल मिरवणूक काढण्यात येणार आहे . मुख्य पुजारी स्वप्नील शिंदे यांच्या घरापासून ते गावातील प्रमुख मार्गाने संदल ढोल ताशाच्या निनादात मिरवणूक उत्साव गावातील प्रमुख मार्गाने काढण्यात येणार आहे.


संदल कार्यक्रमास परिसरातील भाविक भक्तांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन देविदास धोगडे, रियाज भाई सय्यद, संदेश वाघमारे, साहेबराव भिसे, शेख सत्तार, ममदाली शेख, विनायक गणगोपले, शेख सत्तार, मगदूम तांबोळी, स्वप्नील शिंदे, चांदू वाघमारे, निजामोद्दीन शेख, सद्दाम पिंजारी, करीम खाँ पठाण, तेजस भिसे, आजय घोरबांड, संजू लंकढाई, इब्राहिम तांबोळी, विष्णुकांत कांबळे नांदेडकर, सोनबा शामदीरे, चांदू बाबळे, विकी सोनटक्के, बालाजी जाधव सिडको, दिंगाबर मोरे , सोनबा शामदिरे यांच्यासह सरकर मित्र परिवार व गावकरी यांनी केले आहे.

