
हिमायतनगर। शहर व तालुका परिसरात मोठया प्रमाणात अवैध प्रवासी वाहतूक होते आहे, यातील अनेक वाहने खिळखिळी झाली असल्यामुळे अपघाताची दाट शक्यता आहे. असाच एक अपघात पारवा (खु) येथील शालेय विद्यार्थिनीना घेऊन येणाऱ्या जीपचा सोनारी फाटा टोल नाक्याजवळ झाला. यात 6 विद्यार्थिनी होत्या, त्यापैकी अपघातात 4 विद्यार्थिनी जखमी झाल्या असून, त्यांच्यावर हिमायतनगर येथील खाजगी रुग्णालयात उपचार करण्यात आले आहे. वाहनचालक याच्या बेपर्वाई वृत्तीमुळे अपघात झाल्याचं सांगितले जाते आहे. असे प्रकार व अवैध वाहतुकीवर आळा घालण्यासाठी एसटी महामंडळाच्या बसेस चालू करून महिला पुरुष व विद्यार्थ्यांची गैरसोय टाळावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.


हिमायतनगर शहर हे तालुक्याचे ठिकाण आहे एका बाजूला विदर्भ तर एका बाजूला तेलंगाना राज्य आहे. शहरातील शाळा कॉलेजची संख्या वाढली असून, बाजारपेठ मोठी असल्याने हिमायतनगर शहरात ये जा करणाऱ्या वाहनांची मोठी वर्दळ होत आहे. आज घडीला राष्ट्रीय महामार्गाचे काम झाल्यामुळे या रस्त्यावरून भरधाव वेगात ये जा करणाऱ्या वाहनांची संख्या देखील दुपटीने वाढली आहे. एसटी महामंडळांची संख्या कमी असल्यामुळे हिमायतनगर- भोकर, ढानकी -हिमायतनगर, ब्राह्मणगाव- हिमायतनगर, इस्लापूर -हिमायतनगर, नांदेड, किनवट यांसह ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात अवैध वाहतूक चालविली जात आहे. यावर आरटीओ विभाग व पोलिसांचं अर्थपूर्ण दुर्लक्ष होत असल्याने खाजगी अवैध वाहतूक करताना कोंबड्या सारखे प्रवासी कोंबून वाहने चालविली जात आहेत.


त्यातच अत्यंत जुनाट व खिळखिळी झालेली वाहने त्यांना कोटिंग करून मानवाच्या वाहतुकीसाठी वापरले जात असल्याने प्रवाश्याचा जीव धोक्यात येत आहे. आज सकाळी महिंद्रा मॅक्स एमएच 06 – ए एल 9333 या जीपमधून काही विद्यार्थ्यांना घेऊन हिमायतनगर शहरात येत होती. दरम्यान भरधाव वेगात वाहन चालत असताना चालकाचा वाहनवरील ताबा सुटुत जीप मौजे सोनेरी नजीक असलेल्या टोल नाक्याजवळ पलटी झाली. यात प्रवास करणाऱ्या 1) स्नेहा विलास जाधव 2) वेदिका पंडितराव जाधव 3)समृध्दी पंडितराव जाधव 4)ऋतूजा कोंडबाराव जाधव 5)पुनम राजेश्वर पतंगे व इतर विद्यार्थ्यांनी जखमी झाल्या त्यांना तातडीने काही नागरिकांनी हिमायतनगर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असल्याचे सांगितले जाते.


सर्व विद्यार्थ्यांनीचे नशीब चांगलं म्हणून कुणाच्याही जीवाला धोका झाला नसला तरी एक विद्यार्थ्यांनी गंभीर जखमी झाली असल्याचे सांगितले जाते आहे. या घटनेची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते तथा भाजप युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष रामभाऊ सूर्यवंशी यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी खाजगी रुग्णालयात भेट देऊन जखमींची विचारपूस करून धीर दिला, तसेच भरधाव वेगाने जीप चालून विद्यार्थ्यांना जखमी होण्यास कारणीभूत ठरणाऱ्या चालकांवर कार्यवाही करून पुन्हा अश्या घटना होणार नाहीत यासाठी आवैद्य प्रवासी वाहतूक नियंत्रणात आणण्यासाठी आरटीओ आणि पोलिसांनी प्रयत्न करावे अशी मागणी केली आहे.

दरम्यान अपघाताची माहिती मिळतात हिमायतनगर ठाण्याचे पोलीस निरीक्षक बी डी भुसनुर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री पाटील यांनी रुग्णालयात भेट देऊन जखमीची विचारपूस केली. तसेच या घटनेस कारणीभूत असलेल्या वाहनाचा तपास सुरू केला होत. परंतु वृत्त लिहिपर्यंत या संदर्भात पोलिस ठाण्यात कोणतीही नोंद झाली नव्हती.

आज झालेल्या अपघातानंतर सोशल मीडियावर S T बस भोकर डेपोच्या 2-4 बसेस भोकर – हिमायतनगर चालु केल्यास सर्व प्राॕबलम सुटतील, ह्यासाठी कोणी सामाजिक कार्यकर्ता नेता किंवा पत्रकार मंडळी पाठपुरावा केल्यास बरे होईल, अडचणी तर सर्वानांच माहित आहेत त्या सोडविण्यासाठी पाठपुरावा करणे जरुरीचे आहे अश्या प्रतिक्रिया समोर येत आहेत, st महामंडळ बस चालू झाल्यास अवैद्य वाहतुकीवर अंकुश बसेल आणि शासकीय योजनेचा फायदा महिला, पुरुष व शालेय विद्यार्थ्यांना होईल.