
नायगाव, रामप्रसाद चन्नावार। श्री संत साधुमहाराज संस्थान गंगाखेड व साधू महाराज संस्थान समिती गंगाखेड यांच्या संयुक्त विद्यमाने उत्तराखंड येथील श्रीक्षेत्र शुकताल येथे दि. ११ मे ते १७ मे २०२३ या कालावधीत परमपूज्य भागवताचार्य श्री गुरुवर्य चैतन्य महाराज कंधारकर यांची श्रीमद् भागवत कथा होणार आहे.


गेल्या अनेक दिवसांपासून गुरुवर्य चैतन्य महाराज कंधारकर हे भागवत कथा व कीर्तनाच्या माध्यमातून समाजसेवेचे कार्य करीत आहेत. समाजकार्य डोळ्यासमोर ठेवून श्री संत साधुराज यात्रा कमिटीच्या वतीने यंदाचा यात्रेचा कार्यक्रम भागवत कथा शुकताल येथे होणार आहे. या कथेला महाराष्ट्रातून ९ मे शुक्रवारी सकाळी सचखंड एक्स्प्रेसने जवळपास ५०० भाविक जाणार आहेत.
त्याची संपूर्ण तयारी झाली असून दि. ९ मे रोजी नांदेड येथून रेल्वेने भाविक रवाना होणार आहेत. त्यानंतर शुकताल येथे दि. ११ मे ते १७ मे दरम्यान श्रीमद् भागवत कथा नामसंकीर्तन महोत्सव साजरा केला जाणार आहे.


दि. १८ मे ते दि. २० मे दरम्यान त्या परिसरातील तीर्थक्षेत्राचे दर्शन घेतले जाणार आहे. त्यानंतर परतीचा प्रवास होईल. सकाळी कंधारकर शिष्य मंडळीने महाराजा चे व यात्रे करू यांचे स्वागत करून प्रवासास शुभेच्छा देण्यासाठी सचखंड च्या वेळेस नांदेड रेल्वे स्थानक येथे यावे असे आवाहन संस्थान कमिटीचे पदाधिकारी बालासाहेब लख्खेकर, बाळासाहेब पांडे मांजरमकर, संजय रुद्रवार, शशिकांत पाटील, गजानन पाठक, राजु सलगरकर, मनोज आरगुलवार, संगम गंदेवार गंदेवार ,बालाजी मेडेवार, प्रभाकरराव सलगरकर,आदी समिती सदस्य यांनी केले आहे.यात्रा व भागवत यशस्वी करण्यासाठी पदाधिकारी प्रयत्न करीत आहेत.

