
नांदेड/धर्माबाद। धर्माबाद तालुक्यातील बाळापुर व रत्ना भावपूर्व रत्नाळी येथील तलाठी सहदेव बासरे व मंडळाधिकारी कुलकर्णी यांच्या अनागोंदी कारभाराची त्वरित चौकशी करून त्यांची तडकाफडकी बदली करावी अशी मागणी धर्माबाद भाजपाचे तालुकाध्यक्ष रवींद्र पोतगंटीवार यांनी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.


धर्माबाद तालुक्यातील मौजे बाळापुर हे गाव धर्माबाद नगरपरिषद हाजी मध्ये आहे महसूलच्या खरेदी फेरफार, वारसा फेरफार व अन्य महसुली कामासाठी सामान्य नागरिकांना मंडळ अधिकारी व तलाठी यांच्याकडे जावे लागते. परंतु अवास्तव पैशाची मागणी करून मंडळ अधिकारी व तलाठी हे संगणमताने जाणीवपूर्वक लोकांना त्रास देत आहे.


तालुक्याच्या ठिकाणी शहरात दस्त नोंदणी करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार सातबारावर नोंदणी करणे आवश्यक असल्यामुळे 40-50 वर्षापासून नगरपालिका मालकी हक्क व बांधकाम परवानगी ज्यांच्याकडे आहेत. अशाच लोकांना बँकेचा वित्त पुरवठा व शासकीय कामास निमित्त सर्व अहवाल किंवा अन्य सर्व कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर सुद्धा जाणीवपूर्वक त्रुटी काढून 40 ते 50 हजार रुपये प्लॉट धारकाकडून घेतल्याशिवाय सातबारावर नोंद केली जात नाही. धर्माबाद शहरांमध्ये आपल्या सोयीनुसार शेतीचे फोडी करणे खरेदीखत फेरफार वारसा फेरफार व इतर व्यापारी लोकांना हाताशी धरून गुंठेवारीचे अनाधिकृत लाखो रुपये हडप करून शासनाचा महसूल बुडवण्याचा प्रकार सुरू आहे. याबाबत तलाठी बासरी व मंडळ अधिकारी त्यांच्याविरुद्ध जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी स्वरुपात तक्रार करण्यात आली आहे.


विशेष म्हणजे बासरे यांच्याकडे बाळापुर व्यतिरिक्त रत्नाळीचाही अतिरिक्त पदभार आहे. त्यांनी गैरमार्गातून कोट्यावधी रुपयांची मालमत्ता जमविलेले असून त्यांची तात्काळ चौकशी करून बदली करणे गरजेचे आहे . असेही या निवेदनात पोतघंटीवार यांनी नमूद केले आहे. विशेष म्हणजे मागील महिनाभरापासून तलाठी सहदेव भासरे कामावर नसल्याची माहिती असून, त्यांचा फोनही बंद आहे. या संदर्भात तहसीलदारांकडेही तक्रार करण्यात आली आहे. या निवेदनाची तात्काळ जिल्हा प्रशासनाने दखल घेऊन जनतेला न्याय द्यावा अशी मागणी पोतगंटीवार यांनी केली आहे.
