
नवीन नांदेड। नांदेड तालुक्यातील सर्वात मोठया असलेल्या बळीरामपूर ग्रामपंचायत अंतर्गत प्रभाग क्रमांक १ व ६ मधील १५० कुंटूबातील घरांना १५ व्या वितआयोग निधीतून दुतर्फा पिण्याच्या पाईन लाईन टाकून पाणीपुरवठा ८ मे पासून सुरूवात संरपच प्रतिनिधी मुन्ना पांचाळ व उपसरपंच यांच्या उपस्थितीत करण्यात आली, यावेळी गेल्या अनेक वर्षांपासून प्रतिक्षेत असलेल्या महिला व पुरुष यांनी आनंद व्यक्त केला.


गेल्या अनेक वर्षांपासून बळीरामपूर ग्रामपंचायत अंतर्गत प्रभाग क्रमांक १ व ६ मधील जवळपास १५० कुटुंब पाणीपुरवठा योजना पासून वंचित होते, अखेर संरपच सौ. रेणुका इंद्रजित पांचाळ व उपसरपंच नागेश वाघमारे , व सदस्य यांनी पाठपुरावा करून या प्रभागात १५ व्या वित आयोग निधीतून १५० कुंटूबांना पिण्याच्या पाण्याचा सोय उपलब्ध करून दिली आहे. या पाणी पुरवठा योजना शुंभारभ संरपच प्रतिनिधी मुन्ना पांचाळ यांच्या उपस्थितीत करण्यात आला. पाणी टंचाई व ऐन उन्हाळ्यात पाणी पुरवठा सुरू झाल्याने संरपच व उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांच्ये प्रभागातील पुरूष महिला यांनी अभिनंदन केले आहे.

