हिमायतनगर।तालुक्यातील मौजे कारला (पि) येथील सामाजिक कार्यकर्ते सर्वांच्या सुखा दुःखात सामील होणारे व वाद-विवाद मिटवण्यासाठी सतत प्रयत्न करणारे सर्वधर्म समभाव मानणारे डॉ. अब्दुल गफार कार्लेकर यांची एकमताने तंटामुक्ती समिती तालुका अध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे.
ते मौजे कारला (पि) गावचे सतत दुसऱ्यावेळेस बिनविरोध तंटामुक्ती तालुका अध्यक्ष आहेत. गावातील विकासासाठी व वाद विवाद मिटवण्यासाठी गोरगरीब गरजू, लाचार, निराधारांना ते नेहमी मदत करतात त्यांनी शेकडो वाद विवाद मिटवण्यासाठी प्रयत्न केले आहेत. तालुक्यात चोरी,दकैतीची वाढ झाली असता जिल्ह्यात सर्वप्रथम सतत स्वतः पुढाकार घेऊन चार महिने त्यांनी गस्त चालू केल्यामुळे चोरीचे सत्र थांबले होते हाच आदर्श डोळ्यापुढे ठेऊन तालुक्यातील इतर गावात सुद्धा गस्त चालू करण्यासाठी त्यांनी मोलाचा सला दिला होता ते उत्तम वक्ते ,कवी आहेत त्यामुळे त्यांनी आतापर्यंत एक हजार लग्न सोहळ्याचे सूत्र संचलन केले आहे.
त्यांच्या कामाचा आढावा घेऊन पोलीस निरीक्षक – भुसनर, पोलीस निरीक्षक – सेवानिवृत्त भगवान कांबळे यांनी त्यांची नियुक्ती करून त्यांचा सत्कार केला आहे.या निवडीमुळे आमदार – माधवराव पाटील जवळगावकर,रफिक शेठ,गणेशराव शिंदे,संदीप पळशीकर, परमेश्वर गोपतवाड ,रामभाऊ सूर्यवंशी , शुभास राठोड डॉ. घोडगे पो. उपनिरीक्षक देवकते , चोधरी,कुलकर्णी ,राठोड, मलानभाई ,शंकरराव पाटील,गजानन कदम,रोशन धनवे ,नागोराव चव्हाण, मारोतराव लूमदे,जनार्दन ताडेवाड ,सूर्यवंशी गुरुजी ,सोपानराव बॉम्पिलवर, वैजनाथ चप्पलवाड,सुनील घोडगे,रामेश्वर यमजलवड,गजानन मिराशे, दत्ता चींतलवड,आनंदराव सूर्यवंशी, राजू ढानके, संजय गोखले,मारोतराव ढाणके, अंगत सुरोशे पत्रकार… यांनी अभिनंदन केले आहे.