
कंधार,सचिन मोरे। शिवा संघटना तालुका शाखा कंधारच्या वतीने नुकतीच शिवालय या शिवा संघटनेच्या कंधार येथील संपर्क कार्यालयात शिवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. मनोहरराव धोंडे यांच्या अध्यक्षतेखाली जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांची कंधार येथे ८९२ वी जयंती साजरी करण्यासाठी बैठक संपन्न झाली.


बैठकीसाठी प्रमुख पाहूणे म्हणून शिवा संघटना जिल्हा संपर्कप्रमुख इंजि. अनिल माळगे, जिल्हाध्यक्ष संभाजी पा. बुढ्ढे, विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष शुभम घोडके, कर्मचारी महासंघ जिल्हा उपाध्यक्ष बाबुराव फसमले, जी.एस. मंगनाळे, नगसेवक गणेश कुंटेवार, शिवा संघटना तालुकाध्यक्ष बालाप्रसाद मानसपुरे, माधव भालेराव कर्मचारी महासंघ लोहा तालुकाध्यक्ष संजय अकोले आदींची प्रमुख उपस्थिती होती.


यावेळी १८ मे रोजी ४ वाजता महात्मा बसवेश्वर यांची ८९२ वी जयंती मिरवणूक कंधार येथील माईचे मंदिरापासून निघून समारोप कार्यक्रम संत नामदेव महाराज मंगल कार्यालय बसस्थानक येथे होणार आहे. यावेळी महात्मा बसवेश्वर जयंती महोत्सव कंधार ची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली ती पुढील प्रमाणे स्वागताध्यक्ष अँड. मुक्तेश्वर धोंडगे, कार्याध्यक्ष जी. एस. मंगनाळे, जयंती अध्यक्ष भरत चिखलीकर, उपाध्यक्ष कोंडीबा बनसोडे, बाबुराव अभंगे, रोहीत रोयलवाड, सरचिटणीस संभाजी मानसपुरे, नामदेव कल्याणकस्तुरे, गजानन किडे, मुख्य संघटक आनंदराव पेठकर,


बालाजी भूरे, अभिषेक मानसपुरे, कपिल नवघरे, चिटणीस मल्लीकार्जुन किडे, शिवराज भोसीकर, परमेश्वर पोटजळे, कोषाध्यक्ष दत्तात्रेय मंगनाळे, सहकोषाध्यक्ष त्र्यंबक भोसीकर, संजय पाटील, चंद्रकांत जोगदंड, प्रसिद्धी प्रमुख माधव भालेराव, एस.पी. केंद्रे, शेख सिकंदर, सोशल मिडिया प्रमुख दिनेश मानसपुरे, निखिल किडे, बालाजी डोम, सल्लागार गणेश कुंटेवार, बाबूराव फसमले, अशोक मानसपुरे, संभाजी पावडे, किशन तांबोळी, मन्मथ किडे, धोंडिबा जळके, दिगांबर मरशिवणे, युसुफ शेख, प्रल्हाद घोरबांड, साहेबराव राशीवंत, बळीराम पवार, शिवसांब देशमुख, डॉ.भुजंग कवठेकर, आनंदराव पांडागळे, बालाजीराव पांडागळे, बाबुराव कैलासे, कार्यकारणी सदस्य परमेश्वर बोंबले, शेख ऐजाज, गणेश गोरे, गणेश तवंडे, एम.डी. पेठकर, माधव अभंगे, व्ही.एस. आमलापुरे, गोपाळ किरपणे आदीची निवड करण्यात आली. कार्यक्रमाचे सुत्र संचालन चंद्रकांत सोनटक्के तर आभार प्रदर्शन संभाजी पावडे यांनी मानले.
