
नांदेड। गुगल लोकेशन यामध्ये तफावत असल्याचे सांगुन नमूद त्रुटीचे समायोजन करण्यासाठी 20हजाराची लाच मागणाऱ्या प्रल्हाद बळीराम खुडे, वय 40 वर्षे, व्यवसाय नौकरी, पद- सह. शिक्षक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्राथमिक शाळा, बळीरामपूर, ता.जि. नांदेड, सध्या नेमणूक RTE (Right To Education) 25% कागदपत्रे पडताळणी समिती, शिक्षण विभाग, पंचायत समिती, नांदेड, राहणार बसवेश्वर नगर, हडको, नांदेड यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पंचासमक्ष ताब्यात घेऊन कार्यवाही केली आहे. याबाबत तक्रारदार यांनी दि.02 मे रोजी तक्रार दिली होती.


याबाबत सविस्तर वृत्त असे की, यातील तक्रारदार यांनी त्यांचा मुलगा वय 6 वर्षे याचे RTE (Right To Education) 25% अंतर्गत प्रवेशसाठी अर्ज केला होता. निवड यादीत तक्रारदार यांचे मुलाचे अर्जाची निवड झाल्याने RTE(Right To Education) 25% कागदपत्रे पडताळणी समिती, शिक्षण विभाग, पंचायत समिती, नांदेड च्या पडताळणी समितीने तक्रारदार यांचे घरी भेट देवून पडताळणी केली. तक्रारदार यांनी अर्ज करते वेळीचे टाकलेले गूगल लोकेशन व पडताळणी करतांना पडताळणी समितीचे सदस्य यांनी प्रत्यक्ष पाहिलेले गुगल लोकेशन यामध्ये तफावत असल्याचे सांगुन नमूद त्रुटीचे समायोजन करतो, तुम्ही मला 25,000/- रूपये दया असे सांगितले होते.


त्यावरून तडजोडी अंती 20 हजार देण्याचे ठरले, परंतु लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदार यांनी लाचलुचपत विभागास दिलेल्या तक्रारीवरून करण्यात आलेल्या लाच मागणी पडताळणी कारवाई झाली. यात यातील आरोपी यांनी तक्रारदार यांना पंचासमक्ष 20,000/- रूपयाची लाच मागणी केल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यावरून आरोपी लोकसेवक यांना ताब्यात घेतले असुन, पोलीस स्टेशन वजीराबाद येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.


सदरील कार्यवाही डॉ.राजकुमार शिंदे, पोलीस अधीक्षक, अँटी करप्शन ब्युरो,नांदेड परिक्षेत्र,नांदेड, पर्यवेक्षण अधिकारी श्री राजेंद्र पाटील,पोलीस उप अधीक्षक, अँटी करप्शन ब्युरो, नांदेड. यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा/तपास अधिकारी श्री कालीदास ढवळे,पोलीस निरीक्षक, अँटी करप्शन ब्युरो, नांदेड. यांच्या नेतृत्वाखाली ही सापळा कारवाईपथक प्रमुख पोलीस निरीक्षक श्री पखाले, सपोउपनि श्री संतोष शेटे, पोकॉ/अरशद खान, यशवंत दाबनवाड व चापोना/निळकंठ यमुनवाड अँटी करप्शन ब्युरो, युनिट नांदेड यांनी केली.

त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नांदेड जिल्ह्यातील सर्व नागरिकांना अवाहन केले की,त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसम (एजेंट) यांनी कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी करीत असल्यास तात्काळ आमचेशी संपर्क साधावा. तसेच डॉ राजकुमार शिंदे,पोलीस अधीक्षक,अँटी करप्शन ब्युरो, नांदेड परिक्षेत्र,नांदेड मोबाईल क्रमांक 9623999944, राजेंद्र पाटील, पोलिस उप अधीक्षक, अँटी करप्शन ब्युरो, नांदेड मोबाईल क्रमांक – 7350197197कार्यालय दुरध्वनी 02262-253512 @ टोल फ्रि क्रं. 1064 वर संपर्क साधून तक्रार द्यावी.
