
नांदेड। जिल्हयातील सार्वजनिक ठिकाणाहून व बाजारातून महागडे मोबाईल गहाळ झालेल्या मोबाईलचा शोध घेण्याकरीता पोलीस अधिक्षक नांदेड यांनी पो.स्टे. सायबर पोउपनि जी. बी. दळवी यांना आदेशीत केले होते. त्यानूसार सायबर सेलचे एक पथक व नांदेड जिल्हयातील सर्व उपविभागाचे पथक तयार करून मिसिंग मोबाईलचा शोध घेणेची मोहीम राबविण्यात आली होती.


यादरम्यान नांदेड येथील उपविभागातील पथकाने व स्थागुशाच्या पथकाने सायबर सेलचे तांत्रीक सहकार्याने जिल्हयातील गहाळ झालेल्या मोबाईलचा शोध वेगवेगळया ठिकाणी जावून नांदेड जिल्यातील एकूण 110 मोबाईल किंमत 15,18,500/- रूपयाचे हस्तगत केले आहेत. त्यांचे आज एकत्रितरीत्या पोलीस अधिक्षक साहेब यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.


सदरची कार्यवाही ही मा. पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलीस अधिक्षक श्री अबिनाश कुमार, नांदेड डॉ.श्री खंडेराय धरणे, भोकर गृह पोलीस उपअधिक्षक श्रीमती डॉ. अश्विनी जगताप, पो.नि.डि.जी.चिखलीकर स्था. गु.शा. सपोनि. शिवाजी लष्करे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.स्टे सायबर पोउपनि जी. बी. दळवी, सोपान थोरवे, पोलीस अमंलदार सुरेश वाघमारे, राजेन्द्र सिटीकर, दिपक ओढणे, रेशमा पठाण, दाविद पिडगे, काशिनाथ कारखेडे, व्यंकटेश सांगळे, सायबर सेलचे सर्व अधिकारी व अंमलदार यांनी पार पाडली. सदर कामगीरी बाबात मा. पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी सर्व पथकाचे अभिनंदन केले आहे.

