
नांदेड। बेंगलोर केंट रेल्वे स्थानकावर रेल्वे फलाट फॉर्म च्या विस्ताराकरिता काही दिवस लाईन ब्लॉक घेण्यात आला आहे, यामुळे काही रेल्वे गाड्या उशिरा धावणार आहेत तर काही रेल्वे चा मार्ग बदलण्यात आला आहे. यातील नांदेड-बेंगलोर नांदेड एक्स्प्रेस च्या मार्गात काही दिवस तात्पुरता बदल करण्यात आला आहे, तो पुढील प्रमाणे –


मार्ग बदलून धावणारी गाडी :


दिनांक 15, 17, 18,21 आणि 22 मे, 2023 ला बेंगलोर येथून सुटणारी गाडी क्र. 16593 बेंगलोर-नांदेड एक्स्प्रेस बेंगलोर-येशवंतपूर–येल्हंका मार्गे धावेल. बेंगलोर केंट रेल्वे स्थानकावरून धावणार नाही.


दिनांक 30 मे, 2023 ला नांदेड येथून सुटणारी गाडी क्र. 16594 नांदेड-बेंगलोर एक्स्प्रेस येल्हंका-येशवंतपूर–बंगलोर अशी धावेल. बेंगलोर केंट रेल्वे स्थानकावरून धावणार नाही.
