
हिमायतनगर। हिमायतनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी महाजन यांची धर्माबाद पोलिस स्टेशन येथे बदली झाली असून, दि. ९ में रोजी सायंकाळी ६ वाजता एका छोटेखानी कार्यक्रमात निरोप देण्यात आला. यावेळी हिमायतनगर पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक बी. डी. भुसनुर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.


हिमायतनगर पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी पदाधिकारी यांच्यासह हिमायतनगर शहरातील व ग्रामिण भागातील प्रतिष्ठीत जेष्ठ तथा युवा वर्गातील नागरिकांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी महाजन यांना निरोप देण्यासाठी उपस्थित झाले होते. यात हिमायतनगर कृषि उत्पन्न बाजार समीतीचे संचालक शे. रफीक शेठ, हिमायतनगर कृषि उत्पन्न बाजार समीतीचे माजी सभापती परमेश्वर गोपतवाड, बाबुराव बोडेवार, राजुअप्पा बंडेवार, माजी नगराध्यक्ष कुणाल राठोड, काँग्रेस शहराध्यक्ष गजानन चायल, अल्पसंख्याक जिल्हा उपाध्यक्ष फेरोजखान पठाण, विठ्ठल ऐरणकर, दिलीप पाटील लोहरेकर, गोविंद बंडेवार, उदय देशपांडे, पोलीस पाटील शंकर वानखेडे, दत्ता कोंकेवार, प्रभू कल्याणकर, प्रकाश रामदिनवार, एड गुंडाळे, ज्ञानेश्वर पांदलवाड, संदीप तुपतेवार, जेष्ठ पत्रकार असद मोलाना, मन्नान भाई, अशोक अगुलवार, अनिल मादसवार, शे अल्ताफ सोनारीकर, आदींसह हिमायतनगर तालुक्यातील अनेक पत्रकार व शहरातील सर्व पक्षांचे कार्यकर्ते व त्यांचे चाहत्यांनी खास करून उपस्थिती लावली होती.


सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी महाजन यांना निरोप समारंभ कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ गफ्फार यांनी केले तर उपस्थितांचे आभार सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील यांनी मानले. यावेळी हिमायतनगर तालुका वासियांकडुन पोलिस स्टेशन व गृहरक्षक दलातर्फे व विविध गावचे सरपंच, नागरिक यांच्यातर्फे शाल, श्रीफळ, पुष्पहाराने पुढील काळासाठी शुभेच्छा दिल्या.

