
नांदेड। ” दि केरळ स्टोरी ” या चित्रपटाचे बुधवारचे सर्व ५ शो मोफत पाहण्यासाठी मर्यादेपेक्षा जास्त तरुणी आल्यामुळे तातडीने गुरुवारच्या अतिरिक्त एका शोची तिकिटे काढून दिल्यामुळे धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांनी आयोजित केलेल्या या अनोख्या उपक्रमाला प्रचंड प्रतिसाद मिळाला असून आलेल्या शेकडो तरुणींवर पुष्पवृष्टी करत जल्लोषात स्वागत करण्यात आले. प्रत्येक खेळामध्ये वेगवेगळे ड्रेस कोड घातलेल्या १५०३ तरुणींनी लव्ह जिहाद ला बळी न पडण्याची शपथ घेतली.


भाजप महिला आघाडी च्या प्रदेश उपाध्यक्ष प्रणिता चिखलीकर, महानगराध्यक्ष प्रविण साले, विरोधी पक्ष नेते दीपकसिंह रावत, खा. प्रतापराव पाटील चिखलीकर,शिवा मामडे,गणेश महाजन,राहुल सोनवणे, बाबा सुबेकसिंघ यांच्या हस्ते दीप प्रजलन करून विविध शो चे उदघाटन करण्यात आले.या वेळी अशोक धनेगावकर,धीरज शर्मा,वैशाली देशमुख, डॉ. शितल भालके, स्नेहलता जायस्वाल,चंदना विनय भंडारी,महादेवी मठपती,अपर्णा चितळे, दिलीप उत्तरवार,सुरेखा पाटणी,अनिल चिद्रावार अनिकेत येमेकर, व्यंकट अन्नदाते,अमित पाटील, प्रा. मानसपुरे, महेश चांडक, मुकुंद कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती.


प्रत्येक शो च्या सुरुवातीला संयोजक दिलीप ठाकूर यांनी आपल्या प्रस्ताविकातून उपक्रम घेण्या मागची भूमिका स्पष्ट करत होते .भाजपा कामगार आघाडी चे सुरेश लोट यांच्या तर्फे पुषवृष्टी करण्यात आली.सुषमा ठाकूर यांनी काढलेली सुरेख रांगोळी सर्वांचे लक्ष वेधून घेत होती.सविता काबरा,डॉ. रजनी गिल्डा यांनी सर्व मुलींना चंदनाचा टिळा लावला.पहिल्या खेळात निळा, दुसऱ्या मध्ये भगवा,तिसऱ्या मध्ये लाल, चौथ्या शो साठी पिवळा, तर शेवटी पांढरा ड्रेस घालून तरुणी आल्यामुळे वेगवेगळ्या रंगाची जत्रा भरल्याचा प्रत्यय आला.चित्रपट पाहताना तरुणी तिरंगे व भगवे झेंडे हातात घेऊन जय श्रीराम,भारत माता की जय, वंदे मातरम च्या बुलंद आवाजात घोषणा देत असल्यामुळे वातावरण उत्साहीत झाले होते. अंधारात मोबाईल चे फ्लॅश लाईट चालू करून घोषणा दिल्यामुळे असंख्य काजवे चमकण्याचा भास होत होता.


भाजपा महानगर नांदेड तसेच लायन्स क्लब नांदेड सेंट्रल आणि अमरनाथ यात्री संघ नांदेडच्या वतीने उपक्रमासाठी सहकार्य करणाऱ्या देवदत्त देशपांडे,जय श्रीराम मित्र मंडळ, शैलेश इनामदार,नांदेड भूषण राजेंद्र हुरणे व सौ. वंदना इनामदार,राजपूत महिला प्रदेशाध्यक्ष सुषमा ठाकूर,सिध्देश्वर पेठकर, शाम सेन यांचा सत्कार करण्यात आला. रेश्मा धनंजय डोईफोडे,सचिन शिवलाड,रघु गज्जेवार,कुणाल चौधरी,स्मिता रवी कडगे,दिलीप सोनटक्के,अशोक गंजेवार,राहुल साखरे,मैत्री ग्रुप नांदेड,प्रा. संजय पाटील ,डॉ. राजेंद्र मुंदडा,सौ.आराधना संजय जामकर, विवेक जोशी,संजीव गुप्ता,ॲड. विजय पाटनुरकर ,वीरूपक्ष कुलकर्णी, गणेश कोकुलवार,किशोर चिद्रावार मित्र मंडळ धर्माबाद,शिवप्रसाद राठी,ओंकार दिवाकर चौधरी,अशोक साखरे,प्रा. मनीष देशपांडे,केदार आनंद इनामदार, डॉ. दि. बा. जोशी यांना गौरविण्यात आले.

मिलिंद महिंद्रकर,भडके कॉम्प्युटर,महेश माहेवार,रवी जोशी,महेश पाटील,अशोक चणमनवार, सौ.जनाताई भांड,सुमित बंडेवार,देशमुख जिम,इकॉन्स ब्रॉडब्रँड सर्व्हिस,श्रुवा सिमेंट प्रॉडक्ट्स,जयप्रकाश सोनी, संगीता मुकुंद कुलकर्णी,अनिल नरवाडे यांनी केलेल्या सहकार्याबद्दल मोत्याची माळ टाकून सत्कार करण्यात आला.विविध खेळाच्या पूर्वी शाम्भवी साले, जान्हवी चौहान, वैष्णवी लोट, शुभा चांडक व इतर दोंघीनी सर्वाना शपथ दिली. अपेक्षे पेक्षा जास्त तरुणी आल्यामुळे प्रवेश न मिळाल्या मुळे अनेकजण निराश झाले होते. त्यामुळे शिवा मामडे,गणेश महाजन यांच्या सौजन्याने गुरुवारी अतिरिक्त शो ची तातडीने तिकिटे मिळाल्यामुळे त्यांची निराशा दूर झाली.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राजेशसिंह ठाकूर,अजय परमार,संतोष भारती, अरुण काबरा, राजेश कौन्डील, सविता काबरा, सुरेश शर्मा,शिवा लोट,कैलाश महाराज वैष्णव यांनी परिश्रम घेतले.पिव्हीआर चे व्यवस्थापक जयदेवसिंघ खुराणा यांच्या नेतृत्वाखाली अजिंक्य गायकवाड, विवेक सेलूकर, विशाल भालेराव, शंकर लोखंडे, भगवान राठोड यांनी चोख व्यवस्था केल्यामुळे कोणतीही अडचण आली नाही.२५०० तरुणांना कश्मीर फाईल दाखविल्यानंतर केरळ स्टोरी हा देखील चित्रपट देखील १५०३ तरुणीना मोफत दाखविल्या दिलीप ठाकूर यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
