
नांदेड। लव्ह जिहाद सारख्या घातकी प्रकाराला आळा घालण्यासाठी हिंदू धर्मात जनजागृती व्हावी या उद्देशाने प्रदर्शित करण्यात आलेला स्टोरी द केरला स्टोरी हा चित्रपट राज्य सरकारने करमुक्त करावा अशी मागणी भारतीय जनता पार्टी महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा सौ. प्रणिताताई देवरे – चिखलीकर यांनी आज केली . धर्मभूषण दिलीप ठाकूर यांच्या पुढाकारातून नांदेड येथे आज लॉयन्स क्लब नांदेड सेंट्रल आणि अमरनाथ यात्री संघ नांदेडच्या वतीने द केरला स्टोरी हा चित्रपट महिला व मुलींसाठी मोफत दाखविण्यात आला या शो च्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या.
देशात लव जिहादने हिंदू संस्कृतीला पोखरले आहे . असंख्य हिंदू मुलींचे बळी जात आहेत . असंख्य मुलींचे आयुष्य उध्वस्त केले जात आहे . अत्यंत चाणाक्ष बुद्धीचा उपयोग करत धर्मांध मुस्लिमांकडून सुरू असलेला लव जिहाद भारती हिंदू संस्कृतीवर आघात आहे . त्यामुळे हा आघात परतवून लावण्यासाठी आणि हिंदू मुलींचे रक्षण करण्यासाठी जनजागृती व्हावी या उद्देशातून निर्मात्याने द केरला स्टोरी हा चित्रपट प्रदर्शित केला आहे . या चित्रपटाला देशभरातून मोठा प्रतिसाद मिळतो आहे .
कर्नाटक सरकारने हा चित्रपट करमुक्त केला असून त्याच धर्तीवर महाराष्ट्र सरकारने ही द केरला स्टोरी हा चित्रपट करमुक्त करावा अशी मागणी सौ. प्रणिताताई देवरे – चिखलीकर यांनी केली आहे. यावेळी धर्मभूषण एडवोकेट दिलीप ठाकूर यांच्यासह शितलताई भालके, महिला मोर्चा महानगर अध्यक्ष सौ. वैशाली मिलिंद देशमुख, सौ महादेवी मठपती, अपर्णा चितळे , सुरेश लोट अरुण काबरा , राजेश ठाकूर ,भंडारी यांच्यासह महिला व युती मोठ्या प्रमाणे उपस्थित होत्या.
दरम्यान द केरला स्टोरी या चित्रपटाला विरोध करणाऱ्या विरोधकांचाही प्रणिताताई देवरे यांनी यावेळी समाचार घेतला . भारतीय संस्कृतीचे विरोधक हेच द केरला स्टोरी या चित्रपटाला विरोध करत आहेत . ज्यांना अजूनही तुघलकी आणि मोगली सत्ता हवी आहे अशा सत्तापीपासूकडून हिंदू संस्कृतीचा अवमान आणि अपमान केला जात आहे. त्यामुळे अशा नतदृष्ट्यांना आणि धर्मविरोधकांना हा समाज आणि ही संस्कृती कधी माफ करणार नाही असा इशाराही सौ.प्रनिताताई देवरे – चिखलीकर यांनी यावेळी दिला.
या बातम्या देखील आपणास आवडतील
- जलतरणाचे शक्तीकेंद्र नांदेड -NNL
- कोणत्याही परिस्थितीत बाधित शेतकऱ्यांना मदतीसाठी शासन तत्पर – पालकमंत्री गिरीश महाजन -NNL
- मराठा उद्योजक घडविण्यासाठी अण्णासाहेब पाटील महामंडळाचा बँक ऑफ इंडियाशी सामंजस्य करार-NNL
- शिवाजी विद्यालय सिडको शाळेची विशाखापट्टणम येथे शैक्षणिक सहल संपन्न, अनेक भागांना भेटी -NNL