
नांदेड। जिल्हयात फायरींगचे गुन्हे घडणार नाहीत यादृष्टीने सतर्क पेट्रोलींग व आरोपीचा शोध करुन अग्निशस्त्र जप्त करण्याबाबत पोलीस अधीक्षक, नांदेड यांनी आदेश दिलेले आहेत. पोलीस अधीक्षक, नादेड यांचे आदेशानुसार नांदेड जिल्हयातील स्थानीक गुन्हे शाखा नांदेड यांनी पेट्रोलींग व आरोपी शोध मोहीम चालु ठेवली. दरम्यान गावठी कट्टा अग्निशस्त्र व दोन जिवंत काडतुस सह एक आरोपी अटक करण्यात आली आहे.


दिनांक 12/05/2023 रोजी मा. पोलीस निरीक्षक, स्थानीक गुन्हे शाखा नांदेड यांचे आदेशाने सपोनि पांडुरंग माने स्थानिक गुन्हे शाखा नांदेड हे व त्यांचे पथकातील पोलीस अंमलदार क्रियाशील आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलीस अधीक्षक नांदेड, पो.नि. स्थागुशा यांचे आदेशान्वये नांदेड शहरात रवाना झाले होते.
दरम्यान सदर पथकास गोपनिय माहिती मिळाली की, इसम नामे रवी रमेश हाडसे रा. त्रिरत्ननगर सांगवी नांदेड हा दिपक नगर पाटी जवळ त्याचे ताब्यात एक गावठी पिस्टल व जिवंत काडतुसे विक्री करण्यासाठी आला आहे. यावरुन सदर पथकांनी यातील इसमास पकडुन त्याचे नाव गाव विचारले असता त्यांने त्याचे नाव रवी रमेश हाडसे वय 28 वर्षे रा. त्रिरत्ननगर सांगवी नांदेड असे सांगीतले.


त्याची पंचासमक्ष झडती घेतली असता त्याचे जवळ एक गावठी कट्टा पिस्टल अग्निशस्त्र किंमती 30,000/- रुपये व दोन जिवंत काडतुस किमती 2000/- तसेच दोन मोबाईल किमत 90,000/- रुपये असा एकुण 1,22,000/- रुपयाचा माल जप्त करण्यात आला. आहे. जप्त करण्यात आलेला गावठी कट्टा हा रवी हडसे यास त्याचा मित्र मनोज ऊर्फ मण्या पि.शंकर पंतगे रा. जुना मोंढा नवीन पुलाखाली गायत्री मंजरा जवळ गाडीपुरा नांदेड यांनी दिला आहे. दोन्ही आरोपी विरुध्द पोउपनि श्री दतात्रय काळे यांनी पो.स्टे. भाग्यनगर येथे फिर्याद दिली आहे.


सदरची कामगीरी श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधीक्षक, अबिनाश कुमार, अपर पोलीस अधीक्षक, नांदेड यांचे मार्गदर्शनाखाली पो.नि. द्वारकादास चिखलीकर, सपोनि पांडुरंग माने, पोउपनि दतात्रय काळे, पोलीस अंमलदार गंगाधर कदम, तानाजी येळगे, देवा चव्हाण, रनधीर राजबंशी यांनी पार पाडली आहे. सदर पथकाचे मा. श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधीक्षक, नांदेड यांनी कौतूक केले आहे.
