
नांदेड। नागार्जुना पब्लिक स्कूल नांदेडची विद्यार्थिनी रितुल अनिरुद्ध भावसार (दांडगे ) हिने नुकत्याच जाहीर झालेल्या दहावीच्या सीबीएससी बोर्ड परीक्षेत ९५ टक्के गुण संपादन करून विशेष प्राविण्य प्राप्त केले आहे .


विशेष म्हणजे रितूल भावसार हिने कसल्याही प्रकारची खाजगी शिकवणी न लावता स्वबळावर हे यश मिळविले. भविष्यात नवी दिल्ली येथील एम्स येथून वैद्यकीय शिक्षण पूर्ण करण्याची तिची जिद्द आहे.


नागार्जुना पब्लिक स्कूलचे संचालक केशव गड्डम, मुख्याध्यापिका शैला पवार , प्रदीप पवार, संगमकर सर ,सौ अनुपाल कौर सौ संगीता संगमकर ,सौ मोहिनी कान्हेगावकर , सुब्रमण्यम दिक्षीत , अवधूत गिरी ,करुणा लाठकर , दीपक खंडगावकर , सौ मनीषा पाटील ,रवी सोनकांबळे ,मनोज महाजन , गणेश श्रीरामवार , वडील अनिरुद्ध दांडगे व आई सौ .दीपा दांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली अध्ययन करून सदर गुण संपादन केलेले आहेत.


रितुल ही येथील ज्येष्ठ पत्रकार कै.नृसिंह दांडगे यांची नात असून दै .प्रजावाणीचे उपसंपादक अभयकुमार दांडगे यांची पुतणी आहे . रितूलच्या या यशाबद्दल तिचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे .
