
हिमायतनगर। येथील सेवानिवृत्त मलेरिया डॉ रामराव मादसवार यांचे तृतीय चिरंजीव विशाल रामराम मादसवार यांचं ऊन लागून वयाच्या 28 व्या वर्षी दुःखद निधन झालं आहे. त्यांच्या निधनाने मादसवार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या पार्थिवावर सायंकाळी 5 वाजता बोरगडी रोडवरील वैकुंठधाम हिंदू स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.


गेल्या काही दिवसाच्या अवकाळी पावसाने वातावरण गार झाले होते. त्यानंतर में हिटची सुरुवात झाली असतांना उन्हाचा पारा 42 अंश सेल्सिअस पेक्षा अधिक झाला आहे. त्यामुळे उष्णतेत वाढ होऊन उन्हाचे चटके असहाय होऊ लागले आहेत. अश्यात नेहमीप्रमाणे शेतकरी शेती कामात व्यस्त आहेत. अश्याच शेतीकामासाठी दि.12 रोजी हिमायतनगर येथील युवक रामराव मादसवार शेतीत गेला होता. दिवसभर शेती काम करून सायंकाळी 6 वाजता घरी परत आल्यानंतर जेवण केलं. दुसऱ्या दिवशी सकाळी नेहमीप्रमाणे पैरलेसीसचा अटॅक आलेल्या वडिलांची सेवा केली. आणि अचानक अस्वस्थ वाटू लागल्याचे सांगत असतांनाच उलटी झाली.


त्यामुळं नातेवाईकांनी तात्काळ शहरातील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी विशालला मृत घोषित केले. विशाल मादसवार यांच्या उष्माघात होऊन त्यांतच नॉर्मल अटॅक होऊन मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी संगीतल्यामुळे कुटुंबातील सदस्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला. याची माहिती मिळताच सर्वत्र शोककळा पसरली असून, नातेवाईक आप्तस्वकीय व मित्रांनी विशालच्या शेवटच्या अंत्यदर्शनासाठी गर्दी केली होती. मयत विशाल मादसवार यांच्या पार्थिवावर सायंकाळी 5 वाजता हिमायतनगर शहरातील बोरगडी रोडवर असलेल्या वैकुंठधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे नातेवाईकांनी सांगितले. मयत विशाल हे नांदेड न्यूज लाईव्हचे संपादक अनिल मादसवार, शिक्षक राजू मादसवार यांचे चुलत बंधू तर प्रफुल्ल मादसवार, नवीन मादसवार यांचे लहाने बंधू, तर हुतात्मा जयवंतराव पाटील महाविद्यालयाचे सेवक प्रभाकर पोराजवार, भाग्यलक्ष्मी महिला सहकारी बैंके शाखा तामसाचे कर्मचारी संतोष चेपूरवार, परभणी येथील पोलीस कॉन्स्टेबल गणेश चेपूरवार, यांचे सख्खे मेहुणे तर खा हेमंत पाटील यांचे हिमायतनगर जनसंपर्क अधिकारी गोविंद गोडसेलवार यांचे चुलत मेव्हूने होते.

