Sunday, June 11, 2023
Home नायगाव नांदेड – हैदराबाद लातुर – निजामबाद राज्य महामार्गावरील अपघातातील रुग्णांसाठी जगत‌्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानचा आधार -NNL

नांदेड – हैदराबाद लातुर – निजामबाद राज्य महामार्गावरील अपघातातील रुग्णांसाठी जगत‌्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानचा आधार -NNL

नरसी पोलीस चौकीत रुग्णवाहिका अबुलंन्सचा लोकार्पण सोहळा संपन्न

by nandednewslive
0 comment

नायगाव, रामप्रसाद चन्नावार। नांदेड – हैदराबाद लातुर – निजामबाद राज्य महामार्गावरील अपघातातील रुग्णांना आधार म्हणून जगत‌्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या वतीने रामतीर्थ पोलिस ठाण्याअंतर्गत नरसी पोलीस चौकीत दि.१३ मे रोजी प्रशासकिय अधिका-यांसह मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत मोफत रुग्णवाहिकांचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून अध्यक्ष अम्बुलंन्स विभाग सेक्रेटरी कमलाकर हजारे हे होते.

तर व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून कंधारचे उपविभागीय पोलिस अधिकारी श्री. मारोती थोरात, नायगाव चे पोलिस निरीक्षक जयप्रकाश गुट्टे, बिलोलीचे तहसीलदार निळे , रामतीर्थ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संकेत दिघे,काॅंग्रेचे युवा नेते रविंद्र पाटील चव्हाण, भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर, शिवसेना जिल्हाप्रमुख कोकाटे, भाजपचे जिल्हा सरचिटणीस श्रावण पाटील भिलवंडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष भास्कर पाटील भिलवंडे,काॅग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष संभाजी पाटील भिलवंडे,शिवसेना तालुकाप्रमुख रविंद्र पाटील चव्हाण, नायगाव नगर पंचायतीच्या अध्यक्षा मिनाताई सुरेशराव पा.कल्याण, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य माणिकराव लोहगावे, मराठवाडा पिठ प्रमुख गणेश मोरे, मराठवाडा पिठ निरीक्षक प्रदिप गायकवाड, नरसी चे सरपंच गजानन पा.भिलवंडे, नगरसेवक शिवाजी पा कल्याण ,पोलिस पाटील इब्राहिम बेग पटेल यांच्यासह आदि उपस्थित होते.

जगत‌्गुरु नरेंद्राचार्य महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत डि.वाय.एस.पी थोरात, तहसीलदार निळे,अम्बुलंन्स विभाग प्रमुख श्री.हजारेसह आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत रुग्णवाहिकांचा शुभारंभ करण्यात आला. गेल्या अनेक वर्षांपासून नायगाव,बिलोली,कुंटुर रामतिर्थ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील केरुर घाट, खतगाव कमान, बिजुर, धुप्पा,कुंचेली फाटा,किनाळा,हिप्परगा माळ,नरसी, खैरगाव,लोहगाव,मुगाव फाटा,देगाव, घुगराळा,कृष्णुर, रातोळीसह आदीं गावाच्या राज्य महामार्गावर अपघातांच्या प्रमाणात वरचेवर वाढ होत असून, या ठिकाणी तात्काळ रुगणवाहिकेची व्यवस्था नसल्यामुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहे. जगत‌्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज संस्थानच्या वतीने नांदेड जिल्ह्यासाठी एक रुग्णवाहिका देण्यात आले असून संपूर्ण जिल्ह्यांतील सर्वे करून रामतीर्थ पोलीस ठाण्या अंतर्गत नायगाव तालुक्यातील नरसी येथील पोलीस चौकीसाठी हि रुग्णवाहिका देऊन संस्थानाचे कौतुकास्पद कार्य असल्याचे उपस्थित मान्यवरांनी मनोगत व्यक्त करताना बोलत होते.

अध्यक्षीय समारोप करताना अम्बुलंन्स विभाग सेक्रेटरी कमलाकर हजारे म्हणाले की या मोफत रुग्णवाहिकेमुळे राज्य महामार्गावरील अपघातातील रुग्णांना तात्काळ सेवा उपलब्ध होणार असून, यामुळे अनेकांचे प्राण वाचण्यास मदत होईल त्यासाठी सर्वांनी 8888263030 व 8788126723 हा अम्बुलंन्स फोन नंबर असुन जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवा त्यामुळे आपली रुग्णवाहिका अपघातातील रुग्णान पर्यंत सेवा उपलब्ध होणार असल्याचे सांगितले.

याप्रसंगी पोलीस उपनिरीक्षक शिवराज नरवाडे ,जिल्हाध्यक्ष रोहित पा.कदम, जिल्हा सचिव संभाजी पाटील माऊलीकर, तेलंगणा पिठ प्रमुख राजु पानकर, ज.न.म.प्रवर्चनकार सुनंदा पाटील,आयनिले, कोकणे काका,नकाते, अशोकराव चरपीलवाड,नायगाव तालुकाध्यक्ष व्यंकटराव पवारे, अम्बुलंन्स दक्षता अधिकारी सुधाकर साखरे , रामतीर्थ सह आदीं पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांसह जिल्हा सेवा समितीचे सदस्य, तालुका सेवा समितीचे सदस्य उपस्थित होते.

कार्यक्रमाची प्रस्तावना करताना नांदेड जिल्हा निरीक्षक काकासाहेब वनारसे म्हणाले की नाणीजधाम येथील जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानतर्फे सामाजिक बांधिलकी च्या माध्यमातून रक्तदान शिबीर आयोजित करुन एक लाख भाविकांनी रक्तदान केले त्यामुळे अनेकांचे जीव वाचविण्यासाठी मदत झाली आहे. जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या ३७ रुग्णवाहिकाची राज्य महामार्गावर मोफत सेवा सुरू असुन त्यामुळे तिस हजार लोकांचे जीव वाचविण्यासाठी मदत झाली आहे त्याचबरोबर स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून हजारो सेवेकऱ्यांकडून अनेक ठिकाणी स्वच्छता करण्यात आले.पूरग्रस्तांना मदतीच्या माध्यमातून अनेक टन धान्य किटचे वाटपही करण्यात आले.

त्याचबरोबर व्यसनमुक्ती शिबिराच्या माध्यमातून हजारो नागरिक व्यसनमुक्त झाले असून नानिजधाम येथील मठात दररोज दर्शनासाठी आलेल्या लोकांची भोजनाची दोन्ही वेळची विनामूल्य सेवा संस्थानातर्फे केली जाते असते असे अनेक सामाजिक उपक्रम दरमाहा राबविले जात असुन त्यामुळे प्रशासकीय यंत्रणेला मोलाची मदत संस्थानाची होत असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मारोती सुर्यवंशी यांनी केले तर आभार प्रदर्शन सुनंदा पाटील यांनी मानले. यावेळी जिल्ह्यातील सर्वच तालुक्यातीलगुरुबंधू गुरु भगीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संबंधित बातम्या वाचा

Leave a Comment

nandednewslive.com या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेत स्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Visitor counter NNL

Copyright @ 2011-2023 Online Social News Live Channel All Right Reserved -Developed & Designed by M&D Infotech Latur, Call – 86687 76434 

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
error: Content is protected !!