
नवीन नांदेड। कर्नाटक राज्यामध्ये अखिल भारतीय काँग्रेस पक्षाने कर्नाटक विधानसभेच्या १३६ जागा जिंकून विजय संपादन केला. बद्दल सिडको वाघाळा शहर ब्लॉक काँग्रेस कमिटीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक मेन रोड सिडको येथे दि.१३मे रोजी सायंकाळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून परिसरात सिडको भागातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी फटाक्यांच्या आतिषबाजीने, ढोल ताशांच्या गजरात, पेढे वाटून कर्नाटक विजयाचा आनंद साजरा केला.


यावेळी सिडको ब्लॉक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विनोद कांचनगिरे, माजी नगरसेवक प्रा.अशोक मोरे, युवा नेते उदय देशमुख, माजी नगरसेविका डॉ.करुणा जमदाडे, उद्धव ठाकरे गटाचे साहेबराव मामीलवाड, कामगार सेनेचे जिल्हा प्रमुख ब्रिजलाल उगवे, संभाजी ब्रिगेडचे विभागीय अध्यक्ष संकेत पाटील, दीपक भरकड, नांदेड जिल्हा अल्पसंख्यांक आघाडीचे उपाध्यक्ष शेख लतीफ, आहात खान पठाण, मोहम्मद नुरूद्दीन, भी. ना. गायकवाड, संतोष कांचनगिरे, किशनराव रावणगावकर, नारायण कोलंबीकर,प्रा. डॉ. रमेश नांदेडकर, राजू लांडगे,देविदास पाटील संजय कदम, विश्वनाथ शिंदे, प्रल्हाद गव्हाणे, दिगंबर मुंडकर,वैजनाथ माने, काशिनाथ गरड, पंढरीनाथ मोटरगे, शेख मोईन लाटकर, देविदास माने, केरबा माने, रामराव जावरे, एस. के. बसवंते, सेख ईसुफ, निवृत्ती कांबळे, पंढरीनाथ रोडे, भुजंग स्वामी, आनंदा गायकवाड, आनंदा वाघमारे, शिवाजी गंगातीरे, अक्षय मुपडे, प्रभू ऊरुडवड, भगवान जोगदंड, स्वप्नजीत पाताळे, एस.के. उदंडे, सायलू अडबलवार, सौ. सुनिता राठोड, सौ.अनिता गजेवार, सौ,कविता चव्हाण,सौ. विमलबाई चित्ते,सौ. देबडवार, सुनंदा बेर्जे, यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. शशिकांत हटकर यांनी केले.

