
नवीन नांदेड। मराठा सेवा संघ सिडको हडको अध्यक्षपदी दिलीप कदम यांची नियुक्ती करण्यात आली असून या निवडीबद्दल अनेकांनी अभिनंदन केले आहे.


जिजाऊ सृष्टी येथे १३ एप्रिल रोजी मराठा सेवा संघाचे सिडको अध्यक्ष त्र्यंबक कदम यांनी राजीनामा दिल्यानंतर नविन अध्यक्षपदासाठी एका बैठकीचे आयोजन जिल्हास्तरीय पदाधिकारी व समाज बांधव यांच्या उपस्थितीत सामाजिक शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय व अग्रेसर असलेले दिलीप कदम यांची सर्वानमुते बिनविरोध निवड करण्यात आली व नियुक्ती पत्र देण्यात आले.
या नियुक्ती पत्रात आपले सामाजिक कार्य तसेच संघटनात्मक कार्याची दखल घेऊन आपली मराठा सेवा संघ सिडको-हडको, नांदेड पदी निवड करण्यात येत आहे.


यापुढेही आपण मराठा सेवा संघाची विचारधारा समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत पोहचवून समाजातील प्रत्येक घटकांचे जीवनमान उंचविण्यासाठी सतत कार्यप्रवण कार्यरत रहावे व मराठा सेवा संघाच्या आचारसंहितेचे व विचारांचे पालन करावे असे नियुक्ती पत्रांत उल्लेख केला आहे, सदरील नियुक्ती पत्र मार्गदर्शक शे.रा.पाटील, कोषाध्यक्ष प्रल्हाद दुरपडे, रमेश पवार जिल्हा सचिव, ऊध्दवराव सुर्यवंशी जिल्हाध्यक्ष ,जे. डी. कदम, उपाध्यक्ष यांनी दिले आहे.


यावेळी साहेबराव गाढे, जयवंतराव काळे, वसंतराव कदम, गोविंदराव मजरे, उत्तम जाधव, माजी अध्यक्ष त्र्यंबक कदम, यांच्या सह पदाधिकारी व समाज बांधव यांच्यी उपस्थिती होती, अध्यक्षपदी निवड झाल्या बदल नवीन नांदेड मराठी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष रमेश ठाकुर, पत्रकार तिरूपती पाटील घोगरे, डि. गा. पाटील, छायाचित्रकार सारंग नेरलकर यांनी सत्कार करून शुभेच्छा दिल्या.
