
नवीन नांदेड। सिडको परिसरातील श्री भगवान बालाजी मंदिराच्या ३३ वा वार्षिक ब्रम्होत्सव निमित्ताने २३ ते ३०मे दरम्यान व २६ ते ३० दरम्यान होम हवन अभिषेक व दैनंदिन भागवत कथाकार सौ. कालींदीताई पंढरपुरकर यांच्या समधुर वाणीतून भागवत कथा दुपारी १ ते ४ आयोजित करण्यात आली आहे.


प्रतिवर्षाप्रमाणे या वर्षीही श्री भगवान बालाजीचा ब्रम्होत्सव दि. २३ मे ते ३० पर्यंत संपन्न होत आहे. तर दि. २६ मे ते दि. ३०मे २३ या कालावधीत आचार्य पंडीत सतीष गुरू सिडको व मंदीर पुजारी दिव्यांशु महाराज यांचे आचार्य तत्वाने विधीपूर्वक संपन्न होत आहे. सकाळी अभिषेक, होम, हवन होईल. दि. २३मे ते दि. ३०मे २३ रोज दुपारी १:०० ते ४:०० पर्यंत भागवताचार्य सौ. कालींदीताई पंढरपूरकर यांचे अधीपत्याखाली श्रीमद् भागवत कथेचे आयोजन करण्यात आले आहे.


दि. २९मे रोजी सायंकाळी ७:१५ वाजता श्री भागवान बालाजी व लक्ष्मी पद्मावती उत्सव मुर्तीची भव्य मिरवणुक मंगलगिरी वाहनातुन मंदिरापासुन मेन रोड डॉ. रायेवार यांचा दवाखाना, शिव मंदीर, संभाजी चौक, एन.डी. ४१ मार्गे मंदिराकडे येणार आहे. मिरवणुकी सोबत महिला व पुरुष भजनी मंडळ राहणार आहेत. रात्री ९:०० वाजता कल्याण उत्सव श्री भगवान बालाजी लक्ष्मी पद्मावती लग्न सोहळा पार पडणार आहे. दि. ३०मे रोजी सकाळी महाअभिषेक, आरती, तीर्थ प्रसादाचा लाभ घ्यावा व नंतर होम, हवन पुर्णाहूती ब्राम्हण सन्मान महा आशिर्वाद सकाळी ११:३० ते १:३० काल्याचे किर्तन ह.भ.प. आनंद महाराज आतांपूरकर यांचे होईल.


काल्याचे किर्तनानंतर महाप्रसाद (भंडारा) होईल.या सोहळ्यात ऑगनवादक, बाळगिर महाराज भोसीकर,तबलावादकबश्री विष्णू महाराज भोसीकर, तर टाळवादक श्री उध्दव महाराज, सिडको हे राहणार आहेत,या सोहळ्याचे श्री भागवत यजमान श्री रामचंद्र शंकरराव कोटलवार ,एम.आय.डी.सी. नांदेड हे राहणार आहेत, भाविक भक्तांनी ब्रम्होत्सव व भागवत कथेचा लाभ घेण्याचे आवाहन अध्यक्ष साहेबराव भिमराव जाधव, कोषाध्यक्ष बाबुराव मारोतराव बिरादार , सचिव व्यंकटराव कोंडलराव हाडोळे, विश्वस्त तुकाराम मल्लीकार्जुन नांदेडकर, आनंद रामभाऊ बासटवार, डॉ.नरेश शंकरराव रायेवार, गोविंद राजाराम सुनकेवार, पुरूषोत्तम शंकरराव जवादवार,वैजनाथ बालाजी मोरलवार, रामचंद्र शंकरराव कोटलवार, पुंडलिक रावसाहेब बिरादार व सर्व उत्सव समिती श्री भगवान बालाजी मंदिर, सिडको नांदेड, यांनी केले आहे.
