
नायगाव, रामप्रसाद चन्नावार। पत्रकार संरक्षण कायद्याचे जनक,मराठी पञकार परिषदेचे मुख्य विश्वस्त व पत्रकारांचे लढवय्ये नेतृत्व एस.एम. देशमुख सर यांचा वाढदिवस आज विविध सामाजिक उपक्रमांतून नायगाव तालुका मराठी पत्रकार संघाच्यावतीने साजरा करण्यात आला.


दरवर्षीप्रमाणेच यंदाही मराठी पत्रकार परिषदेचे कोषाध्यक्ष विजय जोशी, विभागीय संघटक प्रकाश कांबळे,नांदेड जिल्हा मराठी पञकार संघाचे माजी जिल्हाध्यक्ष ॲड.प्रदिप नागापूरकर,जिल्हाध्यक्ष गोवर्धन बियाणी, जिल्हा कार्याध्यक्ष संतोष पांडागळे,माजी जिल्हाध्यक्ष सूर्यकांत सोनखेडकर,माजी जिल्हा उपाध्यक्ष तथा, तालुका प्रभारी लक्ष्मणराव मा.भवरे, माजी जिल्हा उपाध्यक्ष प्रभाकर लखपञेवार यांच्या मार्गदर्शनाखाली आज दि.१३ मे रोजी नायगांव तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले.त्या अंतर्गत ग्रामीण रुग्णालय, नायगांव (बा.) येथे रुग्णांना फळ वाटप तसेच,डॉ मधूसुदन दिग्रसकर यांचे अमृत हॉस्पीटल येथे पत्रकारांची आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले.


याप्रसंगी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डाॅ.कोंपलवाड, यांच्यासह अधिपरिचारिका श्रीमती अलसटवार,ए.एन. पाळेवार,श्रीमती जी.गायकवाड आदी ग्रामीण रुग्णालयाचे कर्मचारी त्याचबरोबर,अमृत हॉस्पीटलच्या डॉ.मीरा सुर्यवंशी,सिस्टर संध्याराणी इंगळे, साईनाथ जलदेवार, ऋषीकेश वडजे, रावसाहेब गाडे आदींनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले.


याप्रसंगी नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाचे माजी जिल्हाध्यक्ष सुर्यकांत सोनखेडकर,माजी जिल्हा उपाध्यक्ष तथा, तालुका प्रभारी लक्ष्मणराव मा.भवरे, माजी जिल्हा उपाध्यक्ष प्रभाकर लखपत्रेवार, माजी तालुकाध्यक्ष गंगाधर पाटील भिलवंडे,तालुकाध्यक्ष गजानन चौधरी,पंडित वाघमारे,रामप्रसाद चन्नावार,दिलीप वाघमारे,लक्ष्मण बर्गे, श्याम गायकवाड, परमेश्वर पाटील जाधव,अनिल कांबळे, किरण वाघमारे, शेषेराव कंधारे,गंगाधर गंगासागरे, प्रशांत वाघमारे,अंकुश देगावकर आदीसह नायगाव तालुका मराठी पत्रकार संघाचे आजी – माजी पदाधिकारी व तालुक्यातील पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. नायगांव तालुका मराठी पञकार संघाचे तालुकाध्यक्ष गजानन चौधरी व तालुका सहसचिव रामप्रसाद चन्नावार यांनी या सामाजिक उपक्रमांचे आयोजन केले होते.
