
नांदेड। अधिस्वीकृती पत्रिकाधारक पत्रकारांना रेल्वे प्रवासातील 50 टक्के सवलत पुर्ववत सुरू करण्यात यावी अशा मागणीचे निवेदन आज केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे जिल्हा मराठी पत्रकार संघ नांदेडच्यावतीने देण्यात आले. यावेळी खा. प्रतापराव पाटील चिखलीकर आदींची उपस्थिती होती.


लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असलेल्या माध्यमांत काम करणार्या अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना रेल्वे प्रवास भाड्यात 50 टक्क्यांची सवलत होती. परंतु कोरोना काळात ही सवलत बंद करण्यात आली. कोरोना काळामध्ये शासन, प्रशासच्यावतीने बंद करण्यात आलेल्या अनेक सोयी-सवलती पुर्ववत सुरू करण्यात आल्या. मात्र अधिस्वीकृतीधारक पत्रकारांसाठी रेल्वे प्रवास भाड्यात असलेली 50 टक्क्यांची सवलत पुर्ववत सुरू करण्यात आली नाही.


त्यामुळे ही सवलत पुर्ववत सुरू करावी अशी मागणी केंद्रीय रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या शिष्टमंडळाने आज केली. शिष्टमंडळात सामना चे जिल्हा प्रतिनिधी तथा मराठी पत्रकार परिषदेचे कोषाध्यक्ष विजय जोशी, जिल्हाध्यक्ष गोवर्धन बियाणी, कार्याध्यक्ष संतोष पांडागळे, सरचिटणीस राम तरटे, रवी संगनवार, सुरेश काशिदे, प्रशांत गवळे, संघरत्न पवार, किरण कांबळे, नकूल जैन, गौतम गळेगावकर आदींची उपस्थिती होती.

