
नवीन नांदेड| श्री साईबाबा यांच्या ३३ व्या वर्धापन दिनानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह व श्रीमद भागवत कथा सोहळा प्रारंभ दि. २५ एप्रिल २३ ते दि. १ जुन २३ भागवत कथाकार हभप ज्ञानेश भक्त महेश महाराज शेवाळकर यांच्या समधुर वाणीतून २ ते ५ आयोजित करण्यात आला असून सप्ताह सांगता हभप गोपाळ महाराज ठाकुर यांच्या काल्याचा किर्तनाने १ जुन रोजी होणार आहे.


सर्व भाविक भक्तांना कळविण्यात आनंद होतो की, प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी श्री जगदीशजी महाराज हनुमान मंदीर गाडीपुरा यांच्या आशिर्वादाने श्री साईबाबा मंदीर कौठा नांदेड येथे अखंड हरिनाम सप्ताह व श्रीमद् भागवत कथा सोहळा आयोजित केला आहे. या सोहळ्याच्या परीसरातील सर्व संता महंतांची उपस्थिती लाभणार आहे. या सोहळ्यात दैनंदिन काकडा आरती,साईबाबा अभिषेक,साई चरित्र पारायण, गाथा भजन,भगवान कथा, हारी पाठ व सायंकाळी हारी कीर्तन आयोजित करण्यात आले.


या सोहळ्यात हभप विश्वनाथ महाराज हिबटकर, हभप परमेश्वर महाराज शहापूरकर, वासुदेव महाराज कौलंबिकर, माधव महाराज सुंकेवार,विश्वनाथ महाराज कांकाडीकर, चंद्रकांत महाराज लाठीकर, गुरुवर्य राम महाराज ठाकुर पंढरपूरकर याचें होणार असून १ जुन रोजी हभप गोपांळ महाराज पंढरपूरकर यांच्ये काल्याचे कीर्तन व साईबाबा आरती व महाप्रसाद भंडारा आयोजित करण्यात आला आहे.


या अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्याला उपस्थित राहण्याचे आवाहन दिलीपभाऊ व्यंकटराव कंदकुरते (अध्यक्ष) जगन्नाथ माधवराव चक्रवार कोषाध्यक्ष श्री बिजू आर ,जिल्हा (उपाध्यक्ष ) श्रीराज जगन्नाथ चक्रवार (सचिव) श्री कन्हैय्यासिंह लाला, मोरे पाटील, पाठक गुरू (पुजारी) ,राजु परमार, सदानंद यादव व साईबाबा मंदीर व गोशाळा, कौठा, नांदेड पदाधिकारी यांनी केले आहे.
