
नांदेड| आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेच्या टीम तर्फे मोफत आयुष्मान कार्ड वाटपाचे शिबिर आयोजित करण्यात आले होते.


या शिबिरात अत्यंत गरीब व गरजू लोकांना पाच लाख रुपयांच्या निशुल्क वैद्यकीय सेवा खाजगी रुग्णालयांमध्ये प्राप्त व्हाव्यात यासाठी आयुष्मान कार्ड तयार करून दिले जाते. या शिबिरासाठी प्रमुख पाहुणे म्हणून प्रकल्प प्रमुख पाहुणे म्हणून मा. डॉ. नारायण राठोड सर , वरिष्ठ व्यवस्थापक श्री सागर पाटील आयोजक सुभाष लोखंडे, माणिकराव हिंगोले हे उपस्थित होते.


शहरातील देगावचाळ परिसरातील प्रज्ञा करुणा विहारात सामाजिक कार्यकर्ते सुभाष लोखंडे आणि माणिकराव हिंगोले यांनी अत्यंत गरीब व गरजू लोकांसाठी आयुष्यमान कार्ड वाटप शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिरात क्षेत्रीय व्यवस्थापक श्री. शरद पवार सर, योजनेचे जिल्हा समन्वयक डॉ. दीपेशकुमार शर्मा सर, जिल्हाप्रमुख श्री. स्वप्निल देशमुख, जिल्हा वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रेमकिशोर वाळवंटे यांच्या सह आरोग्य मित्र श्री. नागसेन कोकरे, श्री. आकाश आटकोरे, श्री. अनिल हनुमंते, श्री. कोंडाप्पा स्वामी, श्री. सुधाकर गंगातीरे आदींनी आयुष्यमान कार्ड बनवण्याच्या प्रक्रियेत सहभाग घेऊन शिबिर यशस्वी बनवण्याचा प्रयत्न केला. या शिबिरात जवळपास ५९७ लाभार्थ्यांचे आयुष्मान कार्ड बनवण्यात आले आणि वाटप करण्यात आले.

