
नविन नांदेड| नांदेड जिल्हा अल्पसंख्यांक आघाडीचे उपाध्यक्ष तथा सिडको भागातील ज्येष्ठ काँग्रेस कार्यकर्ते शेख लतिफ शेख महेमुद यानी केलेल्या उल्लेखनिय पक्ष कार्याची दखल घेऊन राहुल गांधी विचार मंचचे प्रदेश अध्यक्ष संजीव कुमार गायकवाड व नांदेड शहर जिल्हाध्यक्ष राजकमल सिंघ गाडीवाले यांनी शेख लतिफ शेख महेमुद यांची नांदेड जिल्हा शहर सहसचिव पदी नियुक्ती केली आहे.


त्यांना सदरील नियुक्तीचे पत्र नांदेड दक्षिणचे आमदार मोहन अण्णा हंबर्डे व भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष तथा उद्योजक नरेंद्र चव्हाण यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. शेख लतिफ शेख महेमुद यांची निवड झाल्याबद्दल सिडको ब्लॉक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विनोद कांचनगिरे, माजी उप महापौर विनय पाटील गिरडे, माजी नगरसेवक प्रा.अशोक मोरे,


युवा नेते उदय देशमुख,ॲड.श्रीनिवास जाधव, माजी नगरसेविका प्रा.डॉ.ललिता शिंदे बोकारे, माजी नगरसेविका डॉ. करुणा जमदाडे, भि.ना.गायकवाड, किशनराव रावणगावकर, प्रा.डॉ.रमेश नांदेडकर, मोहम्मद नुरोदिन, शेख इसुफ,अक्षय मूपडे, प्रा. शशिकांत हाटकर,शेख अश्फाक,भुजंग स्वामी, भगवान जोगदंड,शादुल पठाण, देवीदास कदम, वैजनाथ माने, यांच्यासह इत्यादींनी अभिनंदन केले आहे.

