
नांदेड। मराठी पत्रकार परिषद मुंबईचे मुख्य विश्वस्त , महाराष्ट्रातील तमाम मराठी पत्रकारांच्या न्यायासाठी सदैव तत्पर असणारे नेतृत्व एस एम देशमुख यांचा वाढदिवस आज जिल्हाभरात उत्साहात साजरा करण्यात आला . नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने साईप्रसाद च्या पुढाकारातून डॉक्टर शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय विष्णुपुरी येथे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी मोफत अन्नदानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.


अन्नदान कार्यक्रमासाठी पत्रकार परिषदेचे विभागीय संघटक प्रकाश कांबळे , नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष गोवर्धन बियाणी, कार्याध्यक्ष संतोष पांडागळे ,जिल्हा सरचिटणीस राम तरटे , परिषद प्रतिनिधी सुभाष लोणे, रविंद्र संगनवार, गजानन कानडे ,प्रल्हाद लोहेकर , सुरेश काशिदे, प्रशांत गवळे , यासीन बेग आदींची यावेळी उपस्थित होते.


मराठी पत्रकार परिषद मुंबई च्या माध्यमातून महाराष्ट्रातील तमाम पत्रकारांना संघटित करत पत्रकार संघाच्या विविध जिल्हा शाखेच्या माध्यमातून पत्रकारांसाठी आणि त्यांच्या न्याय मागण्यासाठी मुख्य विश्वस्त एस एम देशमुख यांनी सातत्याने लढा उभारला आहे.


पत्रकारांवर होणारे हल्ले परतवून लावण्यासाठी आणि हल्लेखोरांना कोठोरातील कठोर शासन व्हावे यासाठी एस एम देशमुख यांच्या पुढाकारातूनच राज्य सरकारने पत्रकार संरक्षण कायदा मंजूर केला आहे. त्यामुळे शहरी आणि ग्रामीण भागातील पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी सातत्याने लढा भरणाऱ्या मुख्य विश्वस्त एस एम देशमुख यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी आज नांदेड शहरात शासकीय रुग्णालयात अन्नदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. साईप्रसादचे सेवक यांनीही यावेळी आयोजित कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडली.
