
हिमायतनगर। तालुक्यातील मौजे मंगरुळ येथील सरपंच प्रतिनिधी जिवनदादा जैस्वाल यांनी समाजासाठी आपण काही तरी देणं लागतो हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून आई वडील यांच छत्र हरवलेल्या एका अनाथ मुलाचं लग्न लाऊन देत एक नवा आदर्श जनतेसमोर ठेवला आहे. त्यांच्या या उपक्रमाचे सर्व स्तरातील नागरिकांतून कौतुक केले जाते आहे.


गावातील आदिवासी समाजातील युवकाचे लहान पणीच आई-वडिलांचे छत्र हरवले होते. तो लग्नायोग्य झाल्यानं सरपंच प्रतिनिधी जिवन जैस्वाल यांनी समोर येवुन त्याच्या लग्नाचा संपुर्ण खर्च उचलुन लहान पणी आई वडीलांचे छत्र हरवलेल्या त्या अनाथ मुलांचे लग्न लावुन दिले. मंगरुळ येथील रहिवासी नवरदेव बालाजी हातमोडे असे तरुणाचे नाव आहे. या तरुणाचे आई वडील तो लहान असतानाच देवाघरी गेले होते. त्याचे पालण पोषण त्याच्या मामा मामीने केले, घरची परिस्थिती बेताची लोकांच्या रोजंदारीवर काम करुन कसा बसा उदरनिर्वाह होतो आहे.


पण लग्न म्हंटले कि खर्च येणारच या काळजीत असतांना हि बाब मंगरुळ गावचे तरुण तडफदार सामाजिक कार्यकर्ते तथा सरपंच प्रतिनिधी जिवन दादा जैस्वाल यांच्या निदर्शनास आली. त्याच क्षणी मागचा पुढचा विचार न करता स्वतः पुढे होवुन माहुर तालुक्यातील मुंगशी येथील रहिवासी शकुराव लोडबा तिळेवाड यांची मुलगी वर्षा हिच्यासोबत सोयरीक झाली.


सोयरिकि पासुन ते लग्न समारंभ पार पाडेपर्यत स्वतः उपस्थित राहुन स्वखर्चाने लग्न समारंभ पार पाडण्यासाठी पुढाकार घेतला. बालाजी हातमोडे व वर्षा तिळेवाड यांच्या विवाह तालुक्यासह परिसरात चर्चेचा विषय ठरला आहे. एका अनाथ मुलाच्या लग्नाची जबाबदारी पार पाडून अश्या कार्यासाठी सर्वांनी पुढं यावं असा संदेश त्यांनी यातून समाजापुढे ठेवला आहे. सर्व स्तरातुन जीवन जैस्वाल यांच्या कार्याचे कौतुक केल्या जात आहे…!
