
हदगाव, शे.चांदपाशा| विदर्भातील व नादेड जिल्ह्यातील उसउत्पदकाच्या दृष्टीने गेल्या सात वर्षापासुन भंगारात गेलेला साखर कारखाना चालू करण्याच ‘चँलेन्ज ‘म्हणून स्विकारल होत. अस हिगोली लोकसभाचे खा हेमत पाटील यांनी हदगाव शहरात कस्तुरी मंगल कार्यालय मध्ये शनीवारी आयोजित केलेल्या उसउत्पादकाच्या मेळाव्यात अध्यक्ष पदावरुन बोलत होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक लोकनेते बाबुराव कदम (कोहळीकर)यांनी केल.


यावेळी हवामान तज्ञ पजाबराव डख व उसउत्पादक शेतीनिष्ठ शेतक-याचा सत्कार करण्यात आला. खा हेमत पाटील पुढे म्हणाले की, राज्याचे माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांनी हा कारखाना पन्नास वर्षापुर्वी सुरु केला होता. पण हा कारखाना गेल्या सात वर्षापासून बंद होता. अन् भंगारात गेल्यातच जमा होता. जेव्हा मी व माझ्या सहकार्यानी या कारखान्यात जुनाट मशनरी ती पण भंगारात निघालेले परिसरात झाडेझुडपे बाभाळीचे झाड तर १५फुट वाढलेली होती.


हा कारखाना तिन ते चार महीण्यात सुरु करायच ‘अस चँलेन्ज समजुन कामाला लागलो. अन् आमच्या प्रयत्नांना यश आले. साखर कारखाना सुरु झाला साखर निघाली पण साखरेला भावाच नसले तरी आम्ही इतक्या कठीण परिस्थितीत मराठवाडा व विदर्भातील सर्व साखर कारखान्या पेक्षा उसाला जास्त भाव दिला अस अभिमानाने खा हेमत पाटील यांनी सागितले.

