
हदगाव,शे.चांदपाशा| नादेड शहरातील आसना नदीच्या परिसरात ‘टी पाईट व वारंगा (फाटा) च्या राष्ट्रीय महामार्गाच्या रोडवरील दिशादर्शक बोर्डवरील हदगाव शहराचा नावाच गायब करण्यात आलेल आहे. विशेष म्हणजे हदगाव शहराच्या हद्दीतुनच तुळजापुर व नागपुर हा राष्ट्रीय महामार्ग जातो. या राष्ट्रीय महामार्गावरील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या प्रशासनाला इथल्या आमदार खासदार यांनी साधी सुचना पण करु नये का..? असा संतप्त सवाल हदगाव शहरवासीयांना पडलेला आहे.


नादेड शहरातील आसना नदीच्या पुलच्या परिसरातुन राष्ट्रीय महामार्ग देशाच्या विविध राज्यात जातो. विशेष म्हणजे आसना पुलच्या परिसरात राष्ट्रीय महामार्गावर लावलेल्या दिशादर्शक बोर्डावर हदगाव शहरातुन जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाच्या दिशा दर्शक बोर्डावर माहुर व नागपुर दर्शवलेले आहे. तर वारंगा (फाटा) इथल्या राष्ट्रीय महामार्गावर दिशादर्शक बोर्डावर फक्त विदर्भातील महागावच नाव दर्शविलेले आहे. महागावला जाणारा राष्ट्रीय महामार्ग हदगाव शहरातुन जातो या बाबतीत माञ आता पर्यत राष्ट्रीय महामार्गाच्या प्रशासनाला इथल्या लोकप्रतिनिधीनी साधी दखल ही घेवू नये ही फार दुर्दैव बाब आहे अशी चर्चा ऐकवायास मिळत आहे.


हदगाव तालुका म्हणजे निवडणूक काळात विविध राजकीय सभांना उतु येणारा व राजकीय उमेदवाराच्या आश्वासनाने तृप्त झालेला तालुका म्हणून या पुर्वी अशीच ओळख असा समज बहुतांशी जणाचा आहे. हदगाव तालुका म्हणजे निजामकालीन नादेड जिल्ह्यातील फार जुना तालुका राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा देशाचे गृहमंत्री स्व.शंकरराव चव्हाण हे प्रथम निवडणूक म्हणजे १९५३ ला वढवली होती हे आवर्जून ऊल्लेख करावा लागेल.

