
नांदेड| जिल्हा परिषदेत दिनांक 8 मे ते 11 मे 2023 दरम्यान जिल्हास्तरीय बदल्या पार पडल्या. यादरम्यान जिल्हा परिषदे अंतर्गत विविध संवर्गातील 373 कर्मचाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. त्यामध्ये जे कर्मचारी दिव्यांग म्हणून कार्यरत आहेत. अशा 115 कर्मचा-यांना बदली मधून सुट देण्यात आली आहे. यात 87 कर्मचा-यांना प्रशासकीय बदलीत सुट तर 28 जणांना विनंती बदलीत प्राधान्य देण्यात आले आहे.


दिव्यांगांचे अनेक प्रश्न सोडवण्यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक वर्षा ठाकूर-घुगे ह्या नेहमी सकारात्मक भूमिका घेऊन त्यांची कामे मार्गी लावलेली आहेत. बदली प्रक्रियेमध्ये देखील दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या बदल्यांमध्ये त्यांनी 115 कर्मचा-यांना सुट दिलेली आहे.त्यामुळे दिव्यांग कर्मचाऱ्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांचे आभार मानले असून आनंद व्यक्त केला आहे.


सदर बदली प्रक्रियेमध्ये जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधीर ठोंबरे, जिल्हा परिषदेचे खाते प्रमुख व त्यांचे अधिनस्त कर्मचा-यांनी बदली प्रक्रियेकामी सहकार्य केले आहे.

