
नांदेड। तेलंगणा राज्यातील निजामाबाद जिल्हयामध्ये बहुजन भारत पार्टीच्या वतीने पार्टीचा वर्धापन दिन व पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. व्यंकटेश कसबे यांच्या 50 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने १४ मे रोजी बहुजन स्वालंबनदीन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्रा. व्यंकटेश कसबे बहुजन भारत पार्टी राष्ट्रीय अध्यक्ष यांनी अध्यक्ष स्थान भुषविले.


बहुजन समाजाची गरिबी व त्यांच्यावर सातत्याने हजारो वर्षापासून होत असलेले अन्याय, अत्याचार आजही आहेत. एकेकाकाळी शासन कर्ता असलेला वर्ग (समाज) आज त्यांची दनिय अवस्था आहे. ही त्यांची गरीबी या वर्गातील लोकांच्या नाकर्ते पणामुळे किंवा लायक नसल्यामुळे नसून ही ब्राम्हाण व्यवस्थेची देण आहे. डॉ. भिमराव आंबेडकरांच्या अथक परिश्रमातून मिळालेल्या मतदानाच्या अधिकाराच्या जोरावर या बहुजन समाजाने अन्यायातून मुक्त होण्यासाठी व गरीबीतून मुक्त होण्यासाठी आपल्या स्वतःच्या पक्षाच्या माध्यमातून शासन कर्ते होणे अत्यंत गरजेचे आहे. बहुजन भारत पार्टीच्या माध्यमातून या समाजाने एकत्र येवून शासन कर्ते बनावे.


ब्राम्हणी शासकांच्या राजकिय शोषणापासून मुक्त व्हावे. सर्व जाती धर्मात विभागलेल्या या बहुजन समाजाच्या लोकांनी एकजुट होवून डॉ. बाबासाहेबांनी सांगितलेली सत्येची गुरुकिल्ली आपल्या हातात घेतल्याशिवाय त्यांची प्रगती होणार नाही, त्यांच्यावरी अन्याय अत्याचार कमी होणार नाहीत आणि त्यांचे प्रश्न सुटणार नाही.


म्हणून यासाठी बहुजन समाजाने स्वतः च्या संसाधनाच्या जोरावर बहुजन भारत पार्टीचे संघटन मजबूत करावे, तरच बहुजन समाज शासन कर्ता होईल या पक्षाच्या मजबुतीसाठी येथून पुढे बहुजनांनी १४ मे हा दिवस बहुजन स्वालंबन दिन म्हणून मोठया प्रमाणात साजरा करावा. त्यासाठी पक्षातील सर्व पदाधिकारी, कार्यकते, पार्टी समर्थकांनी तनमन अर्थ लावून पक्षाच्या कार्यात सहभागी व्हावे असे आव्हाण करण्यात आले.

या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमातील उपस्थितांना बालाजी गजले राष्ट्रीय कोषाध्यक्ष बहुजन भारत पार्टी, मा. बाबुराव गायकवाड प्रभारी तेलंगना राज्य, परमेश्वर वाघमारे महाराष्ट्र प्रदेश सचिव, गोविंद वाघमारे बारुळकर जिल्हाध्यक्ष नांदेड, रंगनाथ भालेराव जिल्हा प्रभारी परभणी,आरुण गऊळकर,अमोल चव्हाण, संदिप गायकवाड, सुरेश गालफाडे, दत्ता सरोदे, कनार्टक, तेलंगना, महाराष्ट्राचे सर्व पदाधिकारी पार्टी समर्थक या कार्यक्रमाला मोठया प्रमाणात उपस्थितीत होते. बाबुराव गायकवाड तेलंगना राज्य प्रभारी यांनी आभार व्यक्त केले.
