नांदेड| निष्पक्ष आणि परखड भूमिका घेवून निरपेक्ष भावनेने सामाजिक सेवेचा वसा चालवित मागील 13 वर्षात सुजाण वाचकांच्या पसंतीस उतरलेल्या दैनिक वाचकमंच परिवाराच्यावतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्या काही मान्यवर व्यक्तींना बसवभूषण ह्या मानाच्या पुरस्कारांनी गौरविण्याचा सोहळा आज रविवार दि.14 मे 2023 रोजी सायंकाळी पाच वाजता सह्याद्री शासकीय विश्रामगृह, स्नेहनगर, नांदेड येथे आयोजित करण्यात आला आहे.
या पुरस्कार वितरण समारंभाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार गंगाधरराव पटणे हे राहणार असून प्रमुख अतिथी म्हणून नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. शशिकांत महावरकर, पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, माजी राज्यमंत्री डी. पी. सावंत आणि दै. लोकपत्रचे आवृत्तीप्रमुख डॉ. गणेश जोशी यांची उपस्थिती राहणार आहे.
तसेच समारंभाचे विशेष सत्कारमूर्ती म्हणून जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर, भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य रामदास पाटील सुमठानकर, दै. सत्यप्रभाचे कार्यकारी संपादक संतोष पांडागळे, जि.प.पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी अभियंता अमोल पाटील, उद्दोजक अनिल शेटकर आणि शिवसेना जिल्हाप्रमुख (ठाकरे गट) बबनराव बारसे यांना समाजभूषण, बसवभूषण, बसवरत्न आणि बसवश्री अशा मानाच्या पुरस्काराने उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे. तरी या कार्यक्रमाला उपस्थित राहून आम्हास सहकार्य करावे, असे नम्र आवाहन दै. वाचकमंचचे संपादक राजेश पटणे तसेच ऋषिकेष कोंडेकर, माधव गोधने यांनी केले आहे.