
नांदेड। शहरातील भाजपचे चिटणीस मनोज यादव. जिल्हा उपाध्यक्ष संदीप छप्परवाल यांचा मुंबई येथील शिवसेना भवनामध्ये शिवसेना सचिव खासदार विनायक राऊत तसेच विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास जी दानवे यांच्या प्रमुख उपस्थित होते.


शिवसेनेत(उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश झाला. प्रवेश करण्यापूर्वी भाजपचे संदीप छप्परवाल यांनी सोशल मीडियावर सध्या स्थितीतील भाजपची परिस्थिती यावर जोरदार टीका केली होती ते व्हाट्सअप मेसेज सर्वत्र व्हायरल झाला होता. आज शिवसेना भवन झालेल्या पक्षप्रवेश सोहळ्यात दोघांनी शिवसेनेचे एक निष्ठेने काम करून गतवैभव प्राप्त करून देण्याचे अभिवचन दिले. या कार्यक्रमास शिवसेनेचे सहसंपर्क प्रकाश मारावार, जिल्हाप्रमुख दत्ता कोकाटे, जिल्हाप्रमुख बबन बारसे, इतर मान्यवरांची उपस्थिती होती.


एकीकडे मिंडे गटात अनेक जण असताना भाजपचे पदाधिकारी शिवसेनेत (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. येणाऱ्या काळामध्ये शिवसेनेसाठी एक चांगलं पाऊल असल्याचे शिवसेना सचिव तथा खासदार विनायक राऊत यांनी म्हटले आहे. पक्षात प्रवेश केलेल्या पदाधिकाऱ्यांचे जिल्ह्यातून अभिनंदनचा वर्षाव होत आहे

