
हिमायतनगर,अनिल मादसवार| येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत काँग्रेसने एकतर्फी विजय मिळविल्यानंतर आज दि.१७ रोजी पदाधिकारी निवड प्रक्रिया पार पडली. यावेळी सर्वानुमते सभापती पदी काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष जनार्धन तांडेवाड तर उपसभापती श्री कदम यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीनंतर गुलालाची उधळण करत काँग्रेस कार्यकर्त्यांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा जाहीर सत्कार केला असून, हदगाव – हिमायतनगर तालुक्याचे आ.माधवराव पाटील जवळगावकर यांनी नूतन सभापती उपसभापती व सर्व संचालकांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.


हिमायतनगर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक पार पडल्यानंतर सभापती व उपसभापती निवडीकडे सर्वांचे लक्ष लागून होते. अखेर या निवडीची तारीख १७ मे निश्चित झाली. त्यामुळे बुधवारी सभापती व उपसभापती निवडीच्या पार्श्वभूमीवर हदगाव – हिमायतनगर तालुक्याचे विद्यमान आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांच्या निवासस्थानी सर्व संचालक मंडळी व काँग्रेस कार्यकर्त्यांची बैठक संपन्न झाली. दरम्यान या पूर्वीपासून अनेक इच्छुकांनी आपली निवड व्हावी म्हणून फिल्डींग लावली होती. आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी सस्पेन्स कायम ठेऊन आ. जवळगावकर यांनी ठरून दिलेल्या संचालकाची निवड दुपारी ३ वाजता करण्यात आली. या निवडीनंतर सभापती – उपसभापती होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या अनेक इच्छुकांच्या अपेक्षा भंग झाल्या आहेत. असे असले तरी आ.जवळगावखर यांचा शब्द प्रमाण मानून सर्व संचालकांना आगामी काळात शेतकऱ्यांच्या सोइ – सुविधेसाठी काम करावे लागणार आहे.


हिमायतनगर कृषीउत्पन्न बाजार समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी गेल्या महिन्यातील दि.२८ एप्रिलला मतदान झाले. दि.२९ एप्रिलला मतमोजणीनंतर निकाल घोषित करण्यात आला. या निवडणुकीसाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना जिल्हाप्रमुख माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर यांनी राष्ट्रवादीला सोबत घेऊन ही निवडणूक लढवीली. तर बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे नेते माजी जिल्हाप्रमुख बाबुराव कदम कोहळीकर यांनी भाजपसोबत युतीत ही निवडणूक लढवीली. मात्र मतदारांनी कोहळीकर व आष्टीकर यांच्या उमेदवारास नापसंत ठरवत, काँग्रेसचे विद्यमान आमदार माधवराव ‘पाटील जवळगावकर यांच्या १८ पैकी १८ उमेदवारास मोठ्या मताधिक्याने विजयी केले. आणि काँग्रेसने निर्विवाद वर्चस्व स्थापित करून विजयाचे शिल्पकार आ.माधवराव पाटील जवळगावकर ठरले.


कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत व्यापारी मतदार संघातुन संदिप शंकरराव पळशीकर, स. रऊफ स. गफुर, ग्राम पंचायत सर्वसाधारण मतदार संघातुन जेष्ठ पत्रकार परमेश्वर लक्ष्मण गोपतवाड, रामराव आनंदराव कदम, ग्राम पंचायत आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक मतदार संघातुन धर्मराज गणपती शिरफुले तर ग्रामपंचायत अनुसुचित जाती/जमाती मतदार संघातुन दादाराव सदाशिव भिसे, सेवा सहकारी संस्था व मागासवर्गीय मतदार संघातुन सुभाष जिवनाजी शिंदे, सेवा सहकारी संस्था जाती भटक्या जमाती मतदार संघातुन श्यामराव दत्तात्रय गडमवाड, सेवा सहकारी संस्था महिला मतदार संघातुन शिलाबाई प्रकाशराव वानखेडे, कांताबाई सजनराव सुर्यवंशी, सेवा सहकारी संस्था सर्वसाधारण मतदार संघातुन प्रकाश विठ्ठलराव वानखेडे, जनार्दन रामचंद्र ताडेवाड, संजय विनायक सुर्यवंशी, राजेश मारोतराव चिकनेपवाड, दत्ता पुंजाराम कोंकेवाड, खंडु मारोती टेकाळे तर कृष्णा तुकाराम राठोड, आणि हमाल माथाडी मतदार संघातुन शे.मासुम शे.हैदर हे विजयी झाले होते. या सर्व १८ संचालक मंडळातून आज सभापती जनार्दन रामचंद्र ताडेवाड, तर उपसभापतीपदी रामराव आनंदराव कदम यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

हिमायतनगर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपती काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष जनार्दन ताडेवाड यांची तर उपसभापती पदी रमेश कदम यांची सर्वांनुमते निवड करण्यात आली. यावेळी आनंदोत्सव साजरा करत नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा माजी जिल्हा परिषद सदस्य सुभाष दादा राठोड, कृषि उत्पन्न बाजार समितीचे संचालक रफिक शेठ, शहराध्यक्ष संजय माने, माजी नगराध्यक्ष अखिल भाई, अल्पसंख्याक विभागाचे जिल्हा उपाध्यक्ष फेरोजखान पठाण आदींसह सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांनी सत्कार करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी धानोरा सोसायटीचे चेयरमन गणेशराव शिंदे, शिवाजी पाटील सिरपल्लीकर, माजी जी प सदस्य समदखान पठाण, पंचायत समितीचे माजी सभापती जोगेंद्र नरवाडे, कानबा पोपलवार, सोपान बोंपिलवार, सुनील वानखेडे, गजानन सुर्यवंशी, अशोक अंगुलवार, पंडित ढोणे आदींसह मोठया प्रमाणावर काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.
