
नांदेड| प्रवाशांची मागणी लक्षात घेवून दक्षिण मध्य रेल्वे ने काचीगुडा ते नगरसोल दरम्यान विशेष गाडीची एक फेरी चालविण्याचे ठरविले आहे, ते पुढील प्रमाणे :–


गाडी क्र. 07187 काचीगुडा ते नगरसोल विशेष गाडी (साप्ताहिक-गुरुवारी) : हि गाडी काचीगुडा येथून दिनांक 18 मे, 2023 रोजी गुरुवारी दुपारी 15:50 वाजता सुटेल आणि विकाराबाद, बिदर, परळी, परभणी, जालना मार्गे नगरसोल येथे दुसऱ्या दिवशी सकाळी 07.00 वाजता पोहोचेल.


गाडी क्र. 07188 नगरसोल ते काचीगुडा विशेष गाडी (साप्ताहिक-शुक्रवारी ) : हि गाडी नगरसोल येथून दिनांक 19 मे, 2023 रोजी शुक्रवारी रात्री 20:00 वाजता सुटेल आणि जालना, परभणी, परळी, विकाराबाद मार्गे काचीगुडा येथे दुसऱ्या दिवशी सकाळी 11:35 वाजता पोहोचेल.

