
नायगाव, रामप्रसाद चन्नावार। नायगाव येथील सुप्रसिद्ध साहित्यिक वीरभद्र मिरेवाड यांच्या ग्रंथाली प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या आनंदाची फुलबाग या बालकविता संग्रहाला पुण्याच्या दोन नामांकित संस्थांचे पुरस्कार जाहीर झाले आहेत.


मराठवाडा साहित्य परिषद पुणे ही 117 वर्ष जुनी परंपरा असलेली नामांकित संस्था आहे. वीरभद्र मिरेवाड यांची संस्थेने वि.वि. बोकिल पुरस्कारासाठी निवड केली आहे .तर पुण्याच्या अ. भा.बालकुमार साहित्य संस्थेने वीरभद्र मिरेवाड यांच्या आनंदाची फुलबाग या कविता संग्रहाला पुरस्कार जाहीर केला आहे.


मराठवाड्याच्या आनंदाची फुलबाग बाल कविता संग्रहावर एकाच वेळी पुण्याच्या नामांकित दोन्ही संस्थेने पुरस्काराची मोहर उमटविली आहे .
मिरेवाड यांना यापूर्वी जे. के जाधव साहित्य, प्रसाद बन ग्रंथ गौरव,अक्षरसागर गारगोटी,साहित्य काव्यमंच कडा, कुंडल कृष्णाई सातारा, शब्दांगण चंद्रपूर, पद्मगंगा अहमदनगर, लोकसंकेत अकोला आदि नामांकित संस्थेचे पुरस्कार प्राप्त झाले आहेत.


त्यांच्या या देशाबद्दल डॉ.अशोक कौतिक कोळी, डॉ.सुरेश सावंत, डॉ. जगदीश कदम ,देवीदास फुलारी ,प्रदीप पाटील इस्लामपूर, संजय ऐलवाड ,एकनाथ आव्हाड ,पंडित पाटील,पाडूरंग पुठ्ठेवाड, महेश मोरे, ज्योती कपिले, सावित्री जगदाळे, हबीब भंडारे, विजय जाधव, नारायण खरात, दिवाकर जोशी, विजय वाकडे, डाॅ.माधव जाधव,आनंद पुपलवाड, दत्ता डांगे, राजेंद्र गहाळ,नागेश शेलार, योगीराज माने, राजेंद्र माळी, नयन राजमाने, शैलजा कारंडे, शितल भालेकर, रामदास केदार, किशन उगले, शंकर बोईनवाड, विलास सिंदगीकर, धनंजय गुडसूरकर,शंकर राठोड हणमंत वानोळे, दिगांबर कानोले आदींनी अभिनंदन केले आहे.
