लोहा| तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तालुकाध्यक्ष पदी माजी नगरसेवक रमेश माळी यांची नियुक्ती करण्यात आली. जिल्हाध्यक्ष हरिहरराव भोसीकर यांनी नियुक्ती पत्र दिले. या निवडीबद्दल रमेश माळी समर्थकांनी फटाके वाजउडवून जल्लोष केला.
नवनियुक्त तालुकाध्यक्ष रमेश माळी हे २००८ मध्ये नगर पालिकेत निवडून गेले. २०१३ ची न. पा. निवडणूक त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून लढविली त्यात ते पराभूत झाले. २०१८ मध्ये त्यांनी थेट जनतेतून’ नगराध्यक्ष पदाची निवडणूक’ अपक्ष म्हणून लढविली होती. समता परिषदेशी ते सलग्न होते. त्यांचे लोहा शहरव तालुक्यात सामाजिक, राजकीय क्षेत्रात काम आहे. आक्रमक, संघटन कौशल्य असलेला सर्व परिचित चेहरा’ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळाला. त्यांच्या नेतृत्वाचा पक्षाला फायदा होणार आहे. पक्षाची झालेली पडझड भरून काढत पक्षाला नवी उभारी देण्याचे मोठे आव्हान रमेश माळी यांच्या समोर आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष हरिहरराव भ तालुकाध्यक्ष पदाच्या नियुक्तीचे पत्र रमेश माळी यावेळी जिल्हा उपाध्यक्ष विक्रम देशमुख जिल्हा सरचिटणीस प्रा.डी पी जांभरुणकर महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष प्रांजलीताई रावणगावकर पक्षाचे जेष्ठ नेते भगवानराव पाटील आलेगावकर, लोहा तालुका रायुकॉ अध्यक्ष शिवराज पाटील पवार चितळीकर, मनोहर पाटील पवार आदी मान्यवर उपस्थित होते.