
नविन नांदेड। श्री.शनिमंदीर देव व श्री संकटमोचन मंदिर देवस्थान हडको येथे २० वा श्री शनि जन्मोत्सव निमित्ताने १९ मे रोजी सकाळी ५१ किलो तेलाचा महाअभिषेक व दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आमदार मोहनराव हंबर्डे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने देवस्थान समिती यांच्या वतीने भव्य सत्कार व महाप्रसाद आयोजन व शिवलीला अमृत ग्रंथाची सांगता होणार आहे.
१९ मे रोजी शनि जंयती निमित्ताने २० वा शनि जन्मोत्सव सोहळा मंदिर देवस्थान समितीच्या वतीने आयोजित करण्यात आला आहे.


सकाळी ६ वाजता गुरू शशिकांत महाराजांच्या अधिपत्याखाली ५१ किलो तेलाचा महाअभिषेक व यावेळी आमदार मोहनराव हंबर्ड यांच्या भव्य सत्कार व महाप्रसाद वाटप करण्यात येणार आहे. शिवलीला अमृत ग्रंथ सुरूवात २ मे १८ रोजी करण्यात आली होती, या ग्रंथाची १९ मे सांगता होणार आहे, शनि जयंती निमित्त भाविक भक्तासाठी १००रूपये शुल्क ठेवण्यात आले आहे, शनि मंदिर येथे उभारण्यात येणाऱ्या भव्य कमान प्रवेश व्दारासाठी भाविक भक्तांनी मदत करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


शनि जंयती निमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमास भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन विश्वस्त मंडळ अध्यक्ष करणसिंह ठाकूर, गोपीनाथ कहाळेकर,माधवराव कदम, संजय जाधव पाटील, आर.किशनराव, बाळासाहेब चव्हाण,दतात्रय सागोरे,शिवाजी आढाव, प्रा.अशोक मोरे,किशोर देशमुख,त्र्यंबक सरोदे, खुशाल कदम, देवबा कुंचेलीकर, निवृत्ती जिंकलवाड व विश्वस्त मंडळ यांनी केले आहे.

