
नवीन नांदेड। गोदावरी नदीच्या पात्रात अज्ञात युवकांचा मृतदेह पाण्यात तरंगताना आढळून आला असुन या प्रकरणी कोणास माहिती असल्यास ग्रामीण पोलीस स्टेशन येथे संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 17/05/23 रोजी गोदावरी नदी पात्रातील विकासनगर-नगीनाघाट बंधारा, कौठा येथे एक 12 ते 14 वर्ष वयोगटातील मुलाचा मृतदेह मिळाला असुन मयत मुलगा ओळखीचा असल्यास अथवा मुलाची ओळख पटल्यास पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीण येथे संपर्क साधण्याचे आवाहन पो.स्टे.नांदेड ग्रामीण02462226373 पोलीस उपनिरीक्षक आंनद बिचेवार मो.नं.9561038001, पोहेकॉ जावेद शेख मो.नं. 8999978576 करण्यात आले आहे.

