
नायगाव, रामप्रसाद चन्नावार। कुंटूर जिल्हापरिषदेच्या शाळेत गत सात वर्षांपासून कार्यरत मुख्याध्यापक संजय राजपूत यांची प्रशासनाने केलेली बदली रद्द करण्यासाठी सातत्याने बातम्या देऊन पाठपुरावा करावा म्हणून त्यांच्या एका हस्तकाकडून थेट पत्रकारांना धमक्या देत दमबाजी करण्याचा प्रयत्न करण्यात आला असून याबाबत सोशल मिडीयातून आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने कपील सूर्यवंशी याच्यावर कुंटूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे.


प्राप्त माहितीनुसार कुटूंर जि.प.शाळेचे मुख्याध्यापक संजय राजपूत हे मागील सात वर्षा पासून या ठिकाणी कार्यरत आहेत.त्यांची नियमा नुसार बदली झाल्याने त्यांचे हस्तक असलेल्या मंडळींनी झालेली बदली रद्द करण्यासाठी राजकीय व शासकीय पातळीवर मोर्चेबांधणी करत शिष्टमंडळा मार्फत गाठीभेटी चा सपाटा चालविला आहे.मुख्याध्यापक राजपूत यांची बदली रद्द करण्यासाठी पत्रकारांनी वृतमान पत्रातून सलग बातम्या द्याव्यात अशी त्यांची अपेक्षा आहे.


मुख्याध्यापक महाशयाच्या मनासारख्या बातम्या येत नसल्याने त्यांचे हस्तक असलेल्या येथील सेवानिवृत्त शिपायाच्या मुलाकडून पत्रकारांना बातम्या द्या म्हणून तगादा लावला जात आहे. निवेदनाच्या अनुषंगानेच बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतरही सतत या प्रकरणात पत्रकारांनी पाठपुरावा करावे अशी त्यांची अपेक्षा आहे. या पूर्वीही कपिल मनोहर सूर्यवंशी यांने दारु पिऊन स्थानिक पत्रकार,ग्रामस्थ यांच्याबरोबर गैरवर्तन केले होते.


या बाबत अनेकांच्या तक्रारी असून या प्रकरणातही त्यांच्या मनासारखे होत नसल्याने मुख्याध्यापक राजपूत यांचा हस्तक कपिल मनोहर सूर्यवंशी यांने पत्रकारांना धमकावत मारहाणीच्या धमक्या दिल्याने शेवटी या प्रकरणी कुटूंर पोलीस ठाण्यात कुटूंर येथील पत्रकार शंकर आडकीने , बालाजी हनमंते, साहेबराव धसाडे, पवनकुमार पुठेवाड, अनिल कांबळे यांच्या फिर्यादीवरून संबंधितांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

दरम्यान कुंटूरचे पत्रकार अनिल कांबळे,बालाजी हानमंते,शंकर अडकिणे, साहेबराव धसाडे व पवनकुमार पुट्टेवाड यांनी स्वतःच या प्रकरणात लक्ष देऊन पोलीसांनी तातडीने दोषींविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याबाबत प्रयत्न करित आहेत. अधिक माहितीसाठी सपोनि विशाल बाहात्तरे यांच्याशी संपर्क साधला असता सदर आरोपी विरोध 499,506 कलम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहीती त्यांनी दिली.

कुंटुर जिल्हा परिषद शाळेतील संजय राजपूत मुख्याध्यापक यांची बदली करण्यात आली आहे. बदली होऊन 8 दिवस झाले असुन 30 तारखे पर्यंत ते बदलीच्या ठिकाणी जाँईन होतील. त्यांच्या बदलीसाठी प्रयत्न करणं हे व्यर्थ आहे. राजपूत सर ही बदली रद्द करावी असे कधी म्हणाले नाहीत. दारू पिऊन त्यांचें नावे घेवून विनाकारण कोणालाही दमदाटी करण योग्य नाही. अशी माहिती – मंगेश हंनवटे सुजलेगाचे केंद्र प्रमुख यांनी सांगितले.
