
नांदेड। वैद्यकिय आघाडी यांच्या तर्फे राज्याचे वैद्किय मंत्री माननीय गिरीश महाजन यांच्या वाढदिवस निमित्तने 2620 रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. या शिबिराची संपूर्ण तयारी डॉ.सचिन संभाजी पाटील उमरेकर यांनी केले होते.


मा.ना.गिरीशभाऊजी महाजन यांच्या “रुग्ण सेवा हिच ईश्वर सेवा” या प्रेरणेने शहरातील तीन ठिकाणी मोफत आरोग्य सेवा देऊन वाढदिवस निमित्त मोठी भेट गिरीश महाजन यांना दिली.गिरीश महाजन यांची कायम रुग्णाला काहीही होवो त्याकरिता ते तत्पर असतात सतत सहा वेळा विधानपरिषद सदस्य म्हणून त्यांची त्यांच्या मतदार संघात मोठी पकड आहे. त्याचा आवडीचा विषय आरोग्य चांगले राहणे त्यांचा हा उद्देश डोळ्या समोर ठेवून नांदेड जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टी च्या कार्यकर्त्यांनी अतिशय मेहनत घेऊन मोठ्या प्रमाणात रुग्ण सेवा दिली.


या शिबिरास खा. प्रतापराव पाटील चिखलीकर, आ. राम पाटील रातोळीकर, प्रवीण साले महानगर जिल्हाध्यक्ष, डॉ पि.टी जमदाडे सर अधिष्ठाता शंकराव चव्हाण शासकीय मेडिकल कॉलेज,चैतन्य बापू देशमुख प्रदेश कार्यकारणी सदस्य, बाळूभाऊ खोमणे प्रदेश कार्यकारणी सदस्य, संजय घोगरे युवा जिल्हा य मोर्चा जिल्हाध्यक्ष, ऍड दिलीप ठाकूर सरचिटणीस भाजपा , ठाण सिंघ भुंगाई अधीक्षक गुरुद्वारा, नांदेड ,मानप्रित सिंघ कुंजीवाले मा गुरुद्वारा बोर्ड सदस्य,गुरमीत सिंग महाराज माझी गुरुद्वारा बोर्ड सदस्य नांदेड, राजेंद्र सिंग पुजारी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष नांदेड,


हरभजन सिंग पुजारी भाजपा हनुमान पेठ मंडळ अध्यक्ष,पूनम कोर धुपिया भाजपा महिला आघाडी उपाध्यक्ष नांदेड, दीपक राव बोधले अध्यक्ष सराफा असोसिएशन नांदेड, डॉ.तुकाराम तळमकर , धर्मप्रकाश पतंगराम हकीम साहब ,रविकिरण डोईफोडे दैनिक प्रजावाणी ,सुभाष शहाणे सराफा कारागीर असोशियन ,दिलीप बंडेवार माजी अध्यक्ष नगरेश्वर मंदिर ,गणेश हरकरे ,राजीव गंगाराम कोमटवार अध्यक्ष रामदूत मित्र मंडळ सुभाषराव येन्नावर हनुमान मंदिर ट्रस्टी,बालाजी गिरगावकर भाजपा महानगर कोषाध्यक्ष,डॉ मोहन चव्हाण बंजारा परिषद प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र राज्य,,सुमित राठोड ,सुरेश लोट, प्रेम जूनी, यांची उपस्थिती होती.

या शिबीरात नांदेड शहरातील नामांकीत तज्ञ डॉक्टर यांच्या कडून आजारा संबधी सल्ला व उपचार करण्यात आलेत. या शिबिरात चष्मे मोफत देण्यात आले या कार्यक्रमाचे आयोजक डॉ.सचिन संभाजी उमरेकर यांनी केले हे शिबिर यशस्वी करण्यासाठी डॉ रामेश्वर भोजने, साईनाथ खानसोळे,सुनील वाडेकर, बंडू मधेवाढ ,राजू नरवाडे, साहेबराव वाघमारे,शुभम कांबळे, प्रकाश वानखेडे ,अमोल जाधव ,सदानंद पुयड ,कामाजी तिडके ,भगवान वरपडे, बालाप्रसाद वडजे ,परीक्षित राणे,संतोष घोडके ,मुस्तफा काजी,चक्रधर कदम, शिबीर समन्वयक म्हणून चक्रधर खानसोळे यांनी काम पाहिले व स्थानिक भाजपचे कार्यकर्ते काम करीत होते.
