
नांदेड| नांदेड जिल्हा न्यायालयीन कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादीत नांदेडच्या पंचवार्षिक निवडणुकीकरीता रविवार दि. १४ मे २०२३ रोजी मतदान होऊन त्याच दिवशी निकाल लागला. या निवडणुकीत सहाय्यक अधीक्षक माधव एम. जडीले यांच्या नेतृत्वाखालील प्रगती पॅनलने समता पॅनलचा धुव्वा उडवित पुन्हा एकदा निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले आहे.


जिल्हा न्यायालयीन पतसंस्थेच्या सन २०२३-२०२८ या पंचवार्षिक निवडणुकीकरीता प्रगती पॅनल व समता पॅनल यांच्यामध्ये सरळ सरळ लढत होती. मागील पंचवार्षिक कालावधीत प्रगती पॅनलच्या विद्यमान संचालक मंडळाने कर्मचार्यांच्या हितावह केेलेल्या कामांची दखल घेऊन पतसंस्थेच्या जिल्हाभरातील सभासदांनी पुन्हा एकदा प्रगती पॅनलला भरघोस मतांनी विजयी केले आहे.


४३६ सभासदांनी लोकशाहीच्या परंपरेचे जतन करत या निवडणुकीत मतदान केले. यामध्ये प्रगती पॅनलचे प्रमुख एम.एम. जडीले, डी.एस. मुस्तापुरे, गुलाब एकनाथराव मोरे, पी.एन. वाठोरे, एस.आर. आडे, बाबु माधवराव गायकवाड, व्ही.व्ही. कृष्णावाड, शेख अझहर, साईनाथ व्यंकटराव कदम, आर.व्ही. लोखंडे हे सर्वसाधारण मतदार संघातून विजयी झाले आहेत. तसेच पी.एम. मगरे, ए.एम. क्षीरसागर व पी.एल. जंगीलवाड हे राखीव मतदार संघातून विजयी झाले असून श्रीमती डी.डी. तायडे व श्रीमती विद्या विकास लोणे हे महिला राखीव मतदार संघातून विजयी झाले आहेत.


प्रगती पॅनलचे सर्वच्या सर्व म्हणजेच १५ उमेदवार भरघोस मतांनी विजयी झाले आहेत. प्रगती पॅनलचा विजय म्हणजे विद्यमान संचालक मंडळाने गत पंचवार्षिक कालावधीमध्ये सभासदांना दिलेली सन्मानाची वागणूक व केलेल्या पतसंस्थेच्या विकास कामाची पावती असल्याचे पतसंस्थेच्या सभासदांतून बोलल्या जात आहे. प्रगती पॅनलच्या नवनियुक्त सर्व पदाधिकार्यांची सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
