
थुंबा-थिरुअनंतपुरम। अथांग पसरलेला निळाशार अरबी सागर , आर.एच. गंगयानच्या लाँचिंगची लगबग ,लाँचिंग पाहण्यासाठी चिमुकल्या विद्यार्थ्यांसह शिक्षक,अधिकारी, स्थानिक निवासी, विविध स्थानावरून आलेले पर्यटक यांची उत्सुकता शिगेला पोहचलेली.


लाँचिंगचा काँउंटडावून सकाळी 11.46 वाजता सुरु तशी सर्वांच्या ह्रदययांची स्पंदनेही तीव्र झालेली अन् तीन..दोन..शून्य काउंटडावून पूर्ण होवून 11.47 वाजता गंगयान आकाशात झेपावले आणि विद्यार्थ्यांच्या चक्षूसह ज्ञानाच्या कक्षाही विस्तारल्या. जवळपास एक टनाचे गंगयान थुंबा लाँचिंग पॅडवरुन प्रत्यक्ष पाहण्याचा योग आज या चिमुकल्या विद्यार्थ्यांना आला.


आजचे गंगयान हे वातावरणाचा अभ्यास करण्यासाठी सोडण्यात आले.संपूर्ण स्वदेशी बनावटीचे मेक इन इंडिया हे यान वीस ते पंचवीस किलोमीटर पृथ्वीच्या कक्षेत स्थापित करण्यासाठी सोळा मिनिटांचा कालावधी लागला.
सँटेलाईट इंजिनिअर सर्वेशकुमार सिंग, वाराणशी यांनी यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करुन थुंबा,श्रीहरीकोटा येथे नेमकी कशी,कोणत्या पध्दतीची लाँचिंग होते,याचे सविस्तर मार्गदर्शन केले.


यावेळी सिध्दी गवते,कार्तिक पार्डीकर,रितिका मेहेत्रे या विद्यार्थ्यांनी उपयुक्त प्रश्न विचारल्यामुळे इंजिनिअर सिंग यांनी त्यांचे कौतुक करुन वैज्ञानिक बनन्याचा मौलिक सल्ला दिला. त्यासाठी कसा अभ्यास करावा, कोणती परीक्षा द्यावी याची इत्यंभूत माहिती दिली. यानंतर विद्यार्थ्यांनी विक्रम साराभाई स्पेस सेंटरला भेट देवून अवलोकन व निरीक्षणे नोंदवली. या सेंटरमध्ये स्वदेशी राँकेट लाँचिंगचा विकास कसा झाला हे पाहतांना एसयलव्हि 3, एएसयलव्हि, जीएसयलव्हि,एलव्हियम 3 या राँकेटच्या कार्याची माहिती घेतली. याप्रसंगी डॉ सविता बिरगे,प्राथमिक शिक्षणाधिकारी यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन करुन भविष्यात या सहलीच्या फलनिष्पत्तीसाठी वैज्ञानिक होण्याच्या शुभेच्छा दिल्या.
