
नांदेड। विभागीय आयुक्त यांच्या प्रेरणेतून वृक्ष लागवडीसाठी राबविण्यात येणा-या हर घर नर्सरी अभियानासाठी नांदेड पंचायत समितीने पुढाकार घेतला असून या अंतर्गत पंचायत समितीचे अधिकारी व कर्मचा-यांनी रोपवाटीका तयार केली आहे.


जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे यांच्या हस्ते नुकतेच बिज रोपन करण्यात आले. यावेळी जल जिवन मिशनचे प्रकल्प संचालक तथा उप मुख्य कार्यकारी अधिकारी नारायण मिसाळ, गट विकास अधिकारी राजकुमार मुक्कावार, कृषी अधिकारी सी.डी. देशमुख, पी.एम. जाधव, विस्तार अधिकारी व्ही.बी. कांबळे, कक्ष अधिकारी एस.के. पंडेवाड, अधिक्षक सुनिता बोबडे व इतर कार्यालयीन कर्मचारी उपस्थित होते.


हर घर नर्सरीसाठी नांदेड पंचायत समितीनच्या अधिकारी व कर्मचा-यांनी मिळून 2 हजार 500 रोपांचे बिज रोपन केले आले. यामध्ये करंजी, चिच, शेवगा, वड आदींचा समावेश आहे. ही रोपे कर्मचा-यांच्या घरी तसेच पंचायत समिती, तहसील कार्यालय व मोठया ग्रामपचायतींमध्ये लावण्यात येणार आहेत. गावस्तरावरही प्रत्येक कुटुंबाने किमान 50 रोपांची निर्मिती करण्यासाठी जनजागृती करण्यात येत असल्याची माहिती गट विकास अधिकारी राजकुमार मुक्कावार यांनी दिली आहे. विदेशी प्रजातींऐवजी स्थानिक प्रजातींच्या रोपांची निर्मिती करण्यावर भर दिला जाणार आहे.

