
नांदेड। केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी हे शनिवार 20 मे 2023 रोजी नांदेड जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा सुधारीत दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.


शनिवार 20 मे 2023 रोजी नागपूर येथून वाहनाने सकाळी 8.30 वा. श्री रेणुका देवी मंदीर येथे आगमन. सकाळी 8.30 ते 10.30 वाजेपर्यंत दर्शन व राखीव. सकाळी 10.40 ते 11.50 वा. पर्यंत श्रीक्षेत्र माहूरगड श्री रेणुकादेवी मंदीर लिफ्टसह स्कायवॉकचे बांधकामाचे भूमिपूजन समारंभास उपस्थिती. स्थळ माहूर येथील पुसद मार्गावर इंडियन ऑईल पेट्रोल पंपाच्या समोरील प्रांगण.


दुपारी 12 ते 12.30 वाजेपर्यंत प्रस्तावित वनविभागाच्या विश्रामगृहाच्या सादरीकरणाचे अवलोकन स्थळ- सा. बां. विभागाचे शासकीय विश्रामगृह माहूर. दुपारी 12.30 ते 2.30 वाजेपर्यंत शासकीय विश्रामगृह येथे राखीव. शासकीय विश्रामगृह माहूर येथून दुपारी 2.30 वा. वाहनाने हिवरा (संगम) ता. महागाव जिल्हा यवतमाळकडे प्रयाण करतील.

