
नांदेड। तालुक्यातील ग्रामपंचायत पोटनिवडणुका घेण्यात आल्या एकूण सात ग्रामपंचायत ग्रामपंचायत निवडणुका होत्या त्यातील दर्यापूर पिंपळगाव निमजी व वांगी या ग्रामपंचायतीत एकही अर्ज आला नाही.


तर पुणे गाव प्रभाग एक दोन व गुंडेगाव प्रभाग दोन-तीन मध्ये एक एक अर्ज प्राप्त झाल्याने या ग्रामपंचायती बिनविरोध झाले आहेत. तर आज तारीख 18 मे गुरुवार सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच पर्यंत मतदान घेण्यात आली मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली सोमेश्वर येथे सकाळी साडेसात वाजता मतदानास प्रारंभ झाला.


या मतदान प्रक्रियेला लिंबगाव चे सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत पवार यांनी मतदान केंद्रावर भेटी देऊन शांततेत मतदान करण्याची आव्हान केली त्यांच्या अधिपत्याखाली पोलीस उपनिरीक्षक सुनील सूर्यवंशी विजय तोंड साम मुंजा चौरे जत्रा राम शिंदे प्रमोद मोरे यांचा अधिपत्याखाली शांततेत मतदान झाले तर नाळेश्वरचे मंडळ अधिकारी अनिल धुळगंडे तसेच रहाटी सज्जाचे तलाठी रणवीर कर यांची मतदान केंद्रावर दिवसभर उपस्थिती होती.


सोमेश्वर येथे मतदान केंद्रावर आज 92 मतदार महिलांनी मतदानाचा हक्क बजावला तर 116 पुरुष मतदारांनी हक्क बजावला एकूण 246 पैकी 208 मतदारांनी हक्क बजावला मतदानाची एकूण टक्केवारी 84.55% मतदानाचा हक्क बजावला तर मी श्री पिंपळगाव येथे एकूण मतदार 213 असून पुरुष 105 व महिला 95 एकूण 200 मतदारांनी हक्क बजावला 94% मतदान झाले असल्याची माहिती खुशाल घुगे यांनी दिली आहे सोमेश्वर येथे शांततेत मतदान झाल्याची माहिती मंडळ अधिकारी अनिल धुळगंडे यांनी दिली आहे.
