
नांदेड| मातृत्व दिनानिमित्त दि १७ मे रोजी निमा वुमेन्स फोरम नांदेड च्या वतीने संध्याछाया वृद्धाश्रम नांदेड येथे महिलांसाठी आरोग्य तपासणी व औषधी वाटप करण्यात आले.


निमा वुमेन्स फोरम नांदेड चा वतीने मातृत्व दिनानिमित्त सकाळी ९ वाजता संध्या छाया वृद्धाश्रम मालेगाव रोड येथे आश्रमातील महिलांसाठी आरोग्यतपासणी व औषधी वाटप व समुपदेशन शिबीर घेउन मातृत्वदिन साजरा केला शिबिरात प्रमुख अथीती म्हणून आश्रमाच्या मुख्य सुरेखा पाटनी याना उत्कृष्ट समाजसेविका म्हणून त्यांना महाराष्ट्र शासनाने पुरस्कार दिल्याबद्दल निमा वुमेन्स फोरमच्या वतीने त्यांचा शाल व पुष्पहार देवून सत्कार करण्यात आला.


रुग्णतपासणी करुन रुग्णांस आयर्न मल्टीविटामिन कफ सिरप पेनकिलर गोळ्या विटामिन सि झिंक टॅबलेट वाटप करुन त्यांना मातृत्वदिन निमित्ताने मिठाई वाटप करण्यात आली ,यावेळी आणि अध्यक्ष डॉ. करुणा जमदाडे उपाध्यक्ष डॉ. सुनीता वैजवाडे सचिव डॉ .माया पवार यांची उपस्थिती होती.

